डुंगीच्या गावामध्ये पुराच्या पाण्याची समस्येबाबत पोलीस प्रशासनाकडून सहकार्याचे आश्वासन

 


संजय कदम 
पनवेल : ७ जुलै,

               पनवेल तालुक्यातील डुंगी गावात दरवर्षी मुसळधार पावसामुळे पाणी शिरून ग्रामस्थांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. यासंदर्भात पुराच्या पाण्याची समस्या जाणून घेण्यासाठी पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्थांची बैठक आयोजित करण्यात आली होती. याबैठकीत पुराच्या पाण्याची समस्येबाबत पोलीस प्रशासनाकडून सहकार्याचे आश्वासन वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी ग्रामस्थांना दिले. 
               डुंगी पारगावच्या पुनर्वसनाला ग्रामस्थांनी सहमती दर्शवल्याने सिडकोतर्फे पुष्पकनगर येथील कुंडेवहाळ मंदीराजवळ सेक्टर २  येथे डुंगीचे पुर्नवसन केले जाणार आहे. मात्र गावात मुसळधार पावसामुळे पाणी शिरून ग्रामस्थांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. यासंदर्भात पुराच्या पाण्याची समस्या जाणून घेण्यासाठी पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्थांची बैठक आयोजित करण्यात आली होती.                            या बैठकीत वपोनि नितीन ठाकरे यांनी ग्रामस्थांसोबत चर्चा करून पुराच्या पाण्याची समस्या व विमानतळ लगत गावच्या समस्या याबाबत पोलिसांकडून सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. तसेच यावेळी ग्रामस्थांनी पोलीस प्रशासनाकडून होणाऱ्या कारवाईस सहकार्याचे आश्वासन देण्यात आले. यावेळी पोलीस निरीक्षक दिलीप शिंदे, पोलीस निरीक्षक अजीज बागवान, गोपनीय विभागाचे अधिकारी संजय धारेराव यांच्यासह डुंगी ग्रामस्थ उपस्थित होते. 

Post a Comment

0 Comments

मराठा,कोळी,आगरी,अदिवासी यांची भर सभेत इज्जत काढत असलेला आमदार यांची जागा दाखवून द्या : प्रितम जे. एम.म्हात्रे