संजय कदम
पनवेल : ७ जुलै,
पनवेल शहर पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या विविध प्रकल्पग्रस्त गावांची लोकनेते दि.बा. पाटील २७ गाव प्रकल्प बाधित कृती समितीसोबत पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक संपन्न झाली. याबैठकीत पोलीस प्रशासनाकडून होणाऱ्या कारवाईस योग्य ते सहकार्य केले जाईल असे आश्वासन कृती समितीकडून पोलिसांना देण्यात आले.
पनवेल परिसरात नव्याने होणाऱ्या लोकनेते दि बा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पामध्ये बाधित असणाऱ्या प्रकल्पग्रस्तांनी लोकनेते दि.बा. पाटील २७ गाव प्रकल्प बाधित कृती समिती निर्माण केली आहे. या समितीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी बोलावली होती. याबैठकीत घर भाडे करार, आठवडा बाजार, मार्केट व फेरीवाले, पारगाव डोंगर दर्गा व व विमानतळ लगत गावच्या समस्या याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी जाणून घेतल्या तसेच त्यांच्या समस्यांना सकारात्मकता असल्याचे सांगितले.
या संदर्भात पोलीस प्रशासनाकडून होणाऱ्या कारवाईस योग्य ते सहकार्य केले जाईल असे आश्वासन कृती समितीकडून वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांना देण्यात आले. यावेळी पोलीस निरीक्षक दिलीप शिंदे, पोलीस निरीक्षक अजीज बागवान, गोपनीय विभागाचे अधिकारी संजय धारेराव, लोकनेते दि.बा. पाटील २७ गाव प्रकल्प बाधित कृती समितीचे नंदराज मुंगाजी यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
फोटो : लोकनेते दि.बा. पाटील २७ गाव प्रकल्प बाधित कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या सोबत पनवेल शहर पोलिसांची सकारात्मक चर्चा
0 Comments