बीइंग गुड फाउंडेशन( एन.जी.ओ ) यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांस शैक्षणिक साहित्य वाटप

 


पाताळगंगा न्यूज : वृत्तसेवा 
माजगांव  : २ जुलै, 

         बीइंग गुड फाउंडेशन( एन.जी.ओ ) यांच्या माध्यमातून कोकण एज्युकेशन सोसायटी माध्यमिक शाळा माजगांव येथे  ८ वी ते दहावी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. एन.जी.ओ. ही विविध सामाजिक उपक्रम राबवित असताना सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे काम या संस्थेचे अध्यक्षा वैजंती ठाकूर  करीत आहे.

विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे, व त्यांचा शिक्षणांचा दर्जा वाढावे, त्यांनी शिक्षण घेऊन सुशिक्षित व्हावे,यासाठी या विद्यार्थ्यांना शाळेमध्ये दाखल करून त्यांना शैक्षणिक साहित्य देण्यांचे  काम अनेक वर्ष ही करीत आहे. 


               आपल्या मुलांनी खूप शिक्षण घेवून आकाशाला गवसणी घालावी त्यांनी मोठ्या पदावर विराजमान व्हावे असे प्रत्येक पालकांना वाटत असते.परंतू आताची वाढत जाणारी महाघाई यामुळे आपल्या मुलांचा शालेय शिक्षणाचा खर्च आवाक्याबाहेर येत असल्यामुळे त्यांच्या शिक्षणाचा खर्च आई -वडिलांना कमी व्हवा या उद्देशाने विद्यार्थांना है शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.

             यावेळी बीइंग गुड फाउंडेशन( एन.जी.ओ आध्यक्षा वैजंती ठाकूर  यांच्या हस्ते है शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. सदस्य संदिप पाटील,या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन को.ऐ.सो.माध्यमिक शाळा माजगांव मुख्याध्यापक गौतम कांबळे ह्यांनी केले. सदस्य रणधीर पाटील तसेच शिक्षक वर्ग उपस्थित होते.



  

Post a Comment

0 Comments

अवघा रंग एक झाला,तळवली वारकरी यांच्याकडून पायी दिंडीचे आयोजन