खोपोली नगरपरिषद हद्दीतील शाळांमधील समस्या लवकर सोडवा - आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, खोपोलीचे मुख्याधिकारी यांच्या दालनात बैठक संपन्न

 


समाधान दिसले 
खालापूर १ जुलै,

        कोकण विभाग शिक्षक पदवीधर मतदार संघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी खोपोलीतील नगरपरिषद शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांचा समस्या संदर्भात ३०  जून रोजी खोपोली नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी तथा प्रशासक अनुप दुरे यांची भेट घेत अनेक विषयांवर चर्चा केली आहे.
              तर मुख्याधिकारी यांचा दालनात आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे या उपस्थितीत झालेल्या बैठकीत खोपोली नगरपरिषदेच्या शाळा, शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थ्याच्या विविध समस्यांना बाबत भाजपचे शहर अध्यक्ष रमेश रेटरेकर, युवा नेते राहुल जाधव, सरचिटणीस प्रमोद पिंगळे, चिटणीस गोपाळ बावस्कर, गीता मोहिते, दक्षिण रायगड महिला मोर्चा जिल्हा सरचिटणीस वंदना म्हात्रे, शहर अध्यक्षा शोभा काटे, सरचिटणीस अश्विनी अत्रे, उपाध्यक्षा अपर्णा साठे, सुप्रिया नंदे, शिक्षक दिलीप म्हसे यांनी मुख्याधिकारी यांच्याशी चर्चा करित आपल्या मागण्या मांडल्या आहेत.
                तर या सर्व समस्या तातडीने सोडविण्यात यावेत अन्यथा येणाऱ्या पावसाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न म्हणून उपस्थित करण्यात येईल असे आमदार म्हात्रे यांनी मुख्याधिकारी यांना सांगितले. या सर्व समस्या लवकरात लवकर मार्गी लावण्यात येतील असे, आश्वासन मुख्याधिकारी तथा प्रशासक अनुप दुरे यांनी यावेळी दिले आहे. तसेच या बैठकीत ऋषिकेश म्हात्रे, हिंमत मोरे, शिक्षक जनार्दन सताने, नारायण सकपाळ, नरेश पाटील, दुबे सर, अल्ताफ जळगावकर, स्वाती जोशी यांच्यासह भाजप पदाधिकारी - कार्यकर्ते व शिक्षक - नगरपरिषदेचे कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

अवघा रंग एक झाला,तळवली वारकरी यांच्याकडून पायी दिंडीचे आयोजन