साहित्यामध्ये बोलीभाषा संवर्धनाची गरज - नमिता किर पनवेल येथे रायगड जिल्हा कोमसापची बैठक संपन्न ...

 


संजय कदम                                                            पनवेल ५ जुलै 

          पनवेल - रायगड जिल्ह्यात खूप बोलीभाषा आहेत,या बोलीभाषांचे संवर्धन झालं पाहिजे असे आवाहन कोकण मराठी साहित्य परिषदेच्या अध्यक्षा नमिता कीर यांनी पनवेल येथे केले.पनवेल येथे रायगड जिल्हा कोकण मराठी साहित्य परिषदेची बैठक झाली.या बैठकीमध्ये मार्गदर्शन करताना कोमसापच्या अध्यक्षा नमिता कीर बोलत होत्या.                                                                       या बैठकीस कोकण मराठी साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष डॉ.प्रदीप ढवळ,कोकण मराठी साहित्य परिषदेच्या युवाशक्ती प्रमुख दीपा ठाणेकर,कोमसापचे जनसंपर्कप्रमुख रायगडभूषण प्रा. एल.बी.पाटील,रायगड जिल्हा कोमसापच्या उपाध्यक्षा सुजाता पाटील,कोमसापचे जिल्हा प्रतिनिधी गणेश कोळी उपस्थित होते.                                                                      यापुढे बोलताना नमिता कीर म्हणाल्या,कोकण मराठी साहित्य परिषदेच्या दृष्टिकोनातून रायगड जिल्हा हा सर्वात मोठा जिल्हा असून संस्थेमध्ये कोणतेही वाद न घालता काम करा.साहित्य संस्थेसाठी काम करणारी चांगली माणसे आहेत त्यांना वेचून घ्या असे सांगून जगायला विचार लागतात ते साहित्य संस्थेमध्ये मिळतात,राजकारणामधून मिळणार नाहीत.रायगड जिल्ह्यातील साहित्यिकांची एक सूची तयार करावी,जिल्ह्यातील वेगवेगळ्या शाखांमार्फत होणाऱ्या नाविन्यपूर्ण उपक्रमांचे नमिता कीर यांनी कौतुक केले.                          कोकण मराठी साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष डॉ.प्रदीप ढवळ यांनी, साहित्य म्हणजे सहत्व.साहित्य संस्थेमध्ये काम करण्यास अनेक सुवर्णसंधी आहेत त्या पद्धतीने काम, कार्यक्रम-उपक्रम राबवले पाहिजेत. साहित्य संस्था म्हणजे चंगलवाद्यांसाठी ही संस्था नाही. आपल्या साहित्य संस्थेमध्ये युवकांची पिढी अजून कशी गतिमान करता येईल याकडे लक्ष दिले पाहिजे. जिल्ह्यातील वेगवेगळ्या शाखांमध्ये कोणी काम करत नसेल त्यांना काढून टाका,त्यांच्या जागी दुसऱ्यांची नेमणूक करून संस्थेचे आदर्शवत काम करा असे त्यांनी सांगितले.                                 युवा शक्ती प्रमुख दीपा ठाणेकर यांनी, सोशल मीडियावर कोमसाप तसेच युवाशक्तीच्या कार्यक्रमांचा आढावा त्यांनी घेतला.जनसंपर्कप्रमुख प्रा.एल. बी.पाटील यांनी,रायगड जिल्ह्यात उत्कृष्ट काम करणाऱ्या शाखांना पुरस्कार द्या तसेच जिल्ह्यातील प्रकाशित होणाऱ्या लेखकांच्या पुस्तकावर चर्चा झाली पाहिजे.साहित्यिक गप्पागोष्टींचे कार्यक्रम झाले पाहिजे असे सांगितले.                                                                         रायगड जिल्हा कोकण मराठी साहित्य परिषदेच्या उपाध्यक्षा सुजाता पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत जिल्ह्याचे कार्यवाह अजित शेडगे यांनी मागील सभेचे इतिवृत्त वाचन केले.बैठकीत वेगवेगळ्या शाखांच्या कार्यपूर्तीच्या अहवालाची माहिती घेण्यात आली.कामकाज करताना येणाऱ्या अडचणी याविषयी चर्चा करण्यात आली. या बैठकीत कोमसापच्या खोपोली शाखेचे सुधाकर चव्हाण यांचे सभादत्व रद्द करण्याचे जाहीर करण्यात आले.                       या बैठकीचे आयोजन कोमसाप पनवेल आणि नवीन पनवेल शाखेच्यावतीने करण्यात आले.व्यासपीठावरील मान्यवरांचे स्वागत पनवेल शाखेचे अध्यक्ष रोहिदास पोटे,नवीन पनवेल शाखेचे अध्यक्ष गणेश कोळी यांनी केले.शेवटी उपस्थितांचे आभार अजित शेडगे यांनी मानले. बैठकीसाठी विलास पुंडले,अमोल म्हात्रे यांचे सहकार्य लाभले.

Post a Comment

0 Comments

विकास कामाच्या जोरावर महेश बालदि पुन्हा आमदार होणार मा.सरपंच माजगांव- गोपीनाथ जाधव