कृषि आयुक्त सुनील चव्हाण यांचे शेतकऱ्यांस मार्गदर्शन

 


पाताळगंगा न्यूज : वृत्तसेवा                                          खोपोली : ५ जुलै,

                    सुनील चव्हाण, कृषी,आयुक्त,महाराष्ट्र राज्य ,यांनी रामेती खोपोली या ठिकाणी भेट देवून येथिल कामाची पद्धत,आणी नियोजन कसे असते या संदर्भात माहिती जाणून घेतली.त्याचबरोबर  प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग ( पी.एम.एफ.एम.ई ) मध्ये लाभ घेतलेल्या करुणा गायकवाड व त्यांचे पती सुनील गायकवाड यांच्या करुणा चपाती सेंटर येथे भेट देऊन पाहणी करण्यात आली. यावेळी जिल्हा अधीक्षक  कृषी अधिकारी  उज्वला बाणखेले यांनी प्रकल्पाची सविस्तर माहिती उपस्थित जमलेल्या अधिकारी यांनी दिली                                                                          ६.५०  रक्कम रु च्या प्रोजेक्ट ला ३५% अनुदान मिळाले आहे. साधारण ८००  ते १००० हाफ बेक चपाती तयार करून विक्री करत असल्यांचे या व्यवसायीकांने सांगितले.कृषि आयुक्त सुनील चव्हाण यांनी घडीवराची चपाती, खाकरा व पापड करण्याचे सुचवले तसेच ब्राडींग व पॅकिंग विषयी मार्गदर्शन करण्यात आल्यांचे समजले.     


                   स्मार्ट प्रकल्पा अंतर्गत असलेले.सुखकर्ता ऍग्रो फार्मर प्रोडूसर कंपनी कोपरी येथे केळी रायपनिंग चेंबर ला भेट देण्यात आली.यावेळी सुखकर्ता ऍग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनी चे चेअरमन  सुभाष मुंढे यांनी प्रकल्पा बद्दल सविस्तर माहिती दिली. यावेळी केळी वाहतुकीसाठी व्हॅन ची आवश्यकता असल्याचे सांगितल्यावर यावरती आपण सहकार्य करणार असल्यांचे सांगितले.

                  यावेळी  विभागीय कृषी सहसंचालक  ठाणे  अंकुश माने , जिल्हा  कृषी अधिकारी उज्वला बाणखेले , मा.उर्मिला राजपूत प्राचार्य रामेती , मा. स्मार्ट नोडल ऑफिसर  सतीश बोराडे, उपविभागीय कृषी अधिकारी खोपोली मा. नितीन फुलसुंदर,मा. तालुका कृषि अधिकारी उरण अर्चना सुळ   व तालुका कृषि अधिकारी खालापूर मा. सुनील निंबाळकर , जिल्हा गुण नियंत्रण अधिकारी गोरक्षनाथ  मुरकुटे  , मंडळ कृषी अधिकारी खालापूर श्री जे के देशमुख, कृषि पर्यवेक्षक धुमाळ  व महाडिक , कृषि सहाय्यक  नितीन रानजुण , अजित फराटे  व बी टी एम श्रीमती  प्रज्ञा पाटील उपस्थित होते. भेटीच्या वेळेस ( एम सी डी सी ) चे जिल्हा समन्वयक श्री सूरज काशीद,  संभाजी पाटील महड ,  अशोक तट्टू महड व .हिराजी पाटील आपटी उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments

एक्झॉनमोबिल कंपनी कडून विद्यार्थ्यांस शैक्षणिक साहित्य वाटप