तळा तालुका पत्रकार संघाच्या वतीने बळीराजाचा शेताच्या बांधावर सन्मान कार्यक्रम संपन्न
कृष्णा भोसले तळा : १८ जुलै,
दरवर्षी प्रमाणे तळा तालुका पत्रकार संघाच्या वतीने तालुक्यातील दोन प्रयोगशील शेतकऱ्यांचा त्यांच्या शेताच्या बांधावर जाऊन सत्कार करण्याचा उपक्रम राबविला आले वरळ येथील शेतकरी ज्ञानेश्वर हरी शेडगे आणि पिटस येथिल कृष्णकांत हंसाजी पवार येथील प्रयोगशील व प्रगतिशील शेतकरी यांचा आदर्श शेतकरी पुरस्काराने तळा तालुका पत्रकार संघा तर्फे गौरविण्यात आले. तळा तालुका पत्रकार संघाच्या माध्यमातून दरवर्षी जिल्ह्यातील प्रयोगशील,शेतीनिष्ठ शेतकरयांची आदर्श शेतकरी पुरस्कारासाठी निवड़ केली जात असून, निवड़ झालेल्या शेतकर्याना शेताच्या बांधावर जावून सत्कार करण्याचा अभिनव उपक्रम राबविण्यात येतो.यावेळी शेती व्यवसायाला बळ देण्यासाठी शासनाने बळ द्यावे असे मत यावेळी प्रयोग शील शेतकरी यांनी व्यक्त केल. सदर हा कार्यक्रम वरळ येथे श्रीकृष्ण मंदीरात येथे घेण्यात आला.तसेच या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कृष्णा भोसले यांनी केले.प्रास्ताविक कार्यध्यक्षा संध्या पिंगळे यांनी केले. यावेळी उपस्थित मान्यवर म्हणून तालुका कृषी अधिकारी तळा - आनंद कांबळे,सरपंच दिप्ती शेडगे, मंडळ कृषी अधिकारी - सचिन जाधव,कृषी सहाय्यक-गोविंद पोशिमे,स्वदेस समन्वयक - सागर पाटील,पत्रकार संघाचे कार्याध्यक्षा संध्या पिंगळे, सचिव श्रीकांत नांदगावकर, सरपंच ममता वतारी,महीला मंडळ अध्यक्षा सरिता रेवाळे, अंगणवाडी सेविका प्रज्ञा चोरगे,उपसरपंच धाडवे, गावातील जेष्ठ नागरिक, महिला उपस्थित होत्या. यावेळी आदर्श शेतकरी ज्ञानेश्वर शेडगे, कृष्णकांत पवार,यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच तालुका कृषी अधिकारी आनंद कांबळे यांनी आपल्या मनोगतात शेती व त्याविषयी अनेक योजनांची माहिती देवून शेतकरी वर्गांस सहकार्य केले जाईल असे सांगितले.
0 Comments