पाताळगंगा न्यूज : वृत्तसेवा
खालापूर/ माजगांव ३ जुलै,
ग्रूप ग्राम पंचायत सरपंच गोपीनाथ जाधव यांचा सरपंच पदाचा कार्यकाल आज पुर्ण झाला.यावेळी छत्रपती शिवाजी महाराज आणी भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांस हार घालण्यात आले. रायगड जिल्हा परिषद शाळा माजगांव येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.प्रथम आलेल्या मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्जोलित करण्यात आले.यावेळी उपस्थित मान्यवरांनी सरपंच गोपीनाथ जाधव यांनी पाच वर्षात केलेल्या विकास कामे आणी त्यांची कामे करण्यांची पद्धतीने अनेकांनी कुतूहल व्यक्त केले.
यावेळी ग्रामस्थांच्या माध्यमातून बॅंड पतकांचे आयोजन करण्यात आले होते.ग्राम पंचायत कार्यालय ते त्यांच्या निवास स्थांना पर्यंत मिरवणूक काढण्यात आली.यावेळी त्यांच्या समवेत या परिसरातील शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते.सरपंच पदावर असतांना विविध विकास कामे केल्यामुळे तसेच त्यांचा कार्यकाल पुर्ण झाला. मात्र त्यांनी केलेले विकास कामामुळे ग्रामस्थांची मने जिंकली होती. विकास कामे आणी त्यांचा सरपंच पदाचा कार्यकाल पुर्ण झाला असा दुहेरी संगम यामुळे अनेकांनी त्यांच्या निवास स्थांनी जावून शुभेच्छा दिल्या
यावेळी ग्रामसेवक संदीप धारणे, उप सरपंच कल्पना वाघे,मा.उप सरपंच मिनल जाधव,नितिन महाब्दि,उप सभापती विश्वनाथ पाटील,थॅरमॅक्स व्यवस्थापक - सुनिल कदम ,कृ.उ. बा.स. उप सभापती जयवंत पाटील,मा. उप सरपंच - रमेश महाराज,राजेश पाटील,उद्योजक राजेश जाधव,जनार्धन जाधवराव,किशोर पाटील,विलास कांबळे,देवराम कांबळे,किरण पाटील,चंदु पाटील,शांताराम जाधव,सागर महाब्दि,राजेश महाब्दि,शिवाजी शिंदे,विनायक शिंदे,अरुण गो. जाधव,के.एल,जाधव,मधुकर जाधव,नरेश पाटील,रणधीर पाटील,वसंत कांबळे,मिलिंद गायकवाड,संतोष कांबळे,रमाकांत रा. जाधव,
तसेच सरपंच गोपीनाथ जाधव यांनी पाच वर्षात विविध विकास कामे करण्यात आली आमदार महेश बालदि ,जल जीवन मिशन योजना अंतर्गत विकास कामे आंबिवली योजना, माजगांव योजना ,वारद योजना पौध योजना, रायगड जिल्हा परिषद पद्मा सुरेश पाटील यांच्या माध्यमातून विविध विकास कामे,वारद स्मशान भुमी काम पंचायत समिती उप सभापती विश्वनाथ पाटील त्याच बरोबर सरपंच गोपीनाथ जाधव यांनी केलेले विकास कामे
आंबिवली येथील पिण्याची पाण्याची टाकी दुरुस्ती, आंबिवली येथे वॉटर मीटर बसवणे माजगांव आंबिवली पाईपलाईन टाकणे, आंबिवली वैयक्तिक नल कनेक्शन देणे, वारद वैयक्तिक नल योजना, आणि मीटर बसवले, पौध वैयक्तिक नल कनेक्शन व वॉटर मीटर बसवणे, जिल्हा परिषद सेस फंडातून कामे माजगांव गटार, माजगांव वैयक्तिक नवीन कनेक्शन व मीटर बसविणे, माजगांव पाण्याची टाकी दुरुस्ती, आंबिवली ते वारद रस्ता कॉंक्रिटीकरण, माजगांव सभागृह, सम्राट नगर ते विहिरीपर्यंत रस्ता, माजगांव प्राथमिक शाळा दुरुस्ती,
सी.एस.आर फंडातून माजगांव शाळा गृह बांधणे, ताडापासून ते माजगांव पर्यंत काँक्रिटीकरण, माजगांव शेड सिमेंट काँक्रिटीकरण,
आदिवासी वाडी येथे रॅम्प बांधणे, आदिवासी वाडी येथे अंतर्गत पेव्हर ब्लॉक टाकणे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक, सम्राट नगर येथे गटार बांधणे, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक दुरुस्ती, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक आंबिवली, ग्रामपंचायत कार्यालय बांधणे, ग्रुप ग्रामपंचायत हद्दीत सीसीटी कॅमेरे बसवणे, ,
पंचायत समिती सेल्स फंडातून आंबिवली वॉटर फिल्टर एटीएम ,पौध वाडी फिल्टर व एटीएम, माजगाव फिल्टर व एटीएम पौध शाळा दुरुस्ती, सांडपाणी घनकचरा व्यवस्थापक अंतर्गत शोषकड्डा कचरा संकलन टाक्या अंगणवाडी माजगांव इमारत दुरुस्ती,प्रत्येक गावाला पथ दिवे,शाळेतील एम एस ई बी पोल हटविणे अदि विकास कामे करण्यात आली.
0 Comments