नवी मुंबई - वाशी मधील सोयीसुविधा मिळणार आता खोपोलीत,प्रसिद्ध जावेद हबीब हेअरस्टाईल आणि ब्युटी पार्लर शाखेचे उद्घाटन तहसीलदार आयुब तांबोळी यांच्या हस्ते खोपोलीत संपन्न

 


समाधान दिसले                                                               खालापूर : ३ जुलै,


    जावेद हबीब हेअर स्टाइल सलूनची दुकाने संपूर्ण देशभरात पसरलेली आहेत. हेअर स्टाइलिंग, कलरिंग आणि वेगवेगळ्या ट्रिटमेंट मध्ये क्रांती आणण्याचे संपूर्ण श्रेय हे जावेद हबीबला जाते, असे बोलले जाते. जावेद हबीब म्हणजे हेअर केअर क्षेत्रातील एक मोठे नाव हे केवळ भारत देशातच नाही तर जगभरात प्रसिद्ध आहे. मोठमोठे सेलिब्रिटीज त्यांच्याकडून आपल्या हेअर कटींग व स्टाईल करून घेतात. त्यामुळे सामान्य माणसाची सुद्धा अशी इच्छा असते की एकदा तरी जावेद हबीब सलून मध्ये जाऊन हेअरस्टाईल करून घ्यावी. परंतु आता सामान्य माणसाचे हे स्वप्न पूर्ण होणार आहे.                      कारण खालापूर तालुक्यातील खोपोलीमधील शिळफाटा येथे इंदिरा गांधी चौक परिसरात अलैना प्लाझा याठिकाणी तसलीम शानवाज पटेल व शानवाज इब्राहिम पटेल यांच्या मार्फत जावेद हबीब हेअरस्टाईल आणि ब्युटी पार्लर नवीन शाखेचे शुभारंभ करण्यात करण्यात आले आहे, त्यामुळे खोपोली शहरासह रायगड व पुणे जिल्ह्यातील आसपासच्या परिसरातील तरुण तरुणींना आपली मनपसंत हेअर स्टाईल व पार्लर करून घेता येणार आहे.                                                                    तर रविवार दि. 2 जुलै रोजी हबीब हेअरस्टाईल आणि ब्युटी पार्लर शाखेचा नव्याने उद्घाटन खालापूरचे तहसीलदार अयुब तांबोळी यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी खोपोली नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अनुप दूरे, माजी नगराध्यक्ष दत्तात्रय मसूरकर, माजी उपनगराध्यक्ष कुलदिपक शेंडे, माजी जेष्ठ नगरसेवक मोहन औसरमल, इब्राहिम पाटील, किशोर पानसारे, नासिरभाई पटेल, मंगेश दळवी, अमोल जाधव, रमेश जाधव, संदीप पाटील, कमाल पटेल, मुझफ्फर पटेल, उल्हासराव देशमुख, हरीष काळे, विशाल गायकवाड, अतुल पाटील, उबेद पटेल, मुस्तफा दुस्ते, इक्बाल बेडेकर, आकाश सताने यांच्या सह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.   


                           जावेद हबीब हेअरस्टाईल आणि ब्युटी पार्लर शाखेचे खोपोलीत शुभारंभ करण्यात आले असून तरुण, तरुणी, पुरुष व महिलांनी एकदा अवश्य भेट देण्याची विनंती तसलीम शाहनवाज पाटील यांनी केली असून जावेद हबीब हेअरस्टाईल व्यवस्थापकाने सलून मध्ये हेअर कटींग, स्टाइलिंग, कलरिंग, महिलांसाठी पार्लर आणि वेगवेगळ्या ट्रिटमेंट योग्य दरात केले जाणार असल्याची माहिती देत उद्घाटन सोहळा आनंदात संपन्न केला.

Post a Comment

0 Comments

अवघा रंग एक झाला,तळवली वारकरी यांच्याकडून पायी दिंडीचे आयोजन