पाताळगंगा न्यूज : वृत्तसेवा
जांबरुंग : १० जुलै,
महाराष्ट्र शासन- कृषि विभाग तालुका कृषी अधिकारी खालापूर कार्याल यामार्फत भातपिक शेती शाळेचे आयोजन खालापूर तालुक्यातील जांबरुंग या गावामध्ये करण्यात आले.यावेळी महिला वर्गांस शेती मधून अधिक पिके आपणांस घ्यावयांची असेल तर अधुनिक तंत्रज्ञान चा वापर करून आपण शेती मध्ये आमूलाग्र बदल घडवू शकतो.यासाठी कृषी खाते येथिल अधिकारी आपणांस वेळोवेळी मार्गदर्शन करीत असतात.
यावेळी पावसाळी भात पिक हे मोठ्याप्रमाणावर घेतले जात असते.मात्र शेताच्या बांधावर आपण काहितरी तृणधान्य लागवड करून भात शेती बरोबर वेगवेगळ्या प्रकारचे उत्पन्न घेवू शकतो. यावेळी महिलांचे गट निर्मिती करण्यात आली.तसेच जमीन आरोग्य पत्रिकेनुसार खतांचा वापर,भात रोपवाटिका व्यवस्थापन, भात लागवड,अदि विषयी कृषी सहायक मंजुषा शिंदे यांनी महिलांना मार्गदर्शन केले.
महिला वर्गास भातशेती करताना अनेक समस्या निर्माण होत असतात.मात्र कृषि खाते यांचे मार्गदर्शन घेतल्यांस येणाऱ्या अडचणी,मात करु शकतो जसे किडरोग यावर मात करून कमीत कमी खर्चात उत्पादनात अधिक वाढ होत असते.शेतीमधून अधिक उत्पन्न कसे मिळेल हे ध्येय मनाशी बाळगून आपण शेती करण्यांस भर द्यावे. असे मार्गदर्शन महिला वर्गांची शेतीशाळा भरविण्यात आले.यावेळी करण्यात आले.सदर कार्यक्रम उपविभागीय कृषी अधिकारी खोपोली, फुलसुंदर,तालुका कृषी अधिकारी खालापूर सुनिल निंबाळकर,कृषि परिवेक्षक नितिन महाडीक यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले.
0 Comments