श्री स्वामी समर्थ मठ (मंदिर) गावदेवी पाडा येथे गुरुपौर्णिमेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न

 


संजय कदम                                                          पनवेल दि.०३ 

  गुरुपरंपरा असणारा पनवेल मधील एकमेव मठ गावदेवी पाडा येथील श्री स्वामी समर्थ मठ (मंदिर) येथे दरवर्षीप्रमाणे विविध धार्मिक कार्यक्रमाद्वारे गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली.                                                        श्री स्वामी समर्थ मंदिर (मठ) गावदेवीपाडा येथे गुरुपुर्णिमेनिमित्त आज पहाटे ५ वाजल्यापासून विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये काकड आरती, पोथी वाचन, श्रवणीय प्रवचन, श्री स्वामी समर्थ महिला भजन मंडळ यांचे भजन आदी कार्यक्रम भाविकांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यानिमित्त असंख्य भाविकांनी मठात भेट देत स्वामींचे दर्शन घेतले. तसेच गुरुपौर्णिमेनिमित्त शहरातील महात्मा फुले आगरी समाज हॉल येथे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.                                                     याचा लाभ शेकडो भक्तांनी घेतला. यावेळी मठाधीपती सुधाकर घरत (भाऊ), कु. अवधुत सुधाकर घरत व श्री स्वामी समर्थ भक्त मंडळाचे सदस्य उपस्थित होते.   


Post a Comment

0 Comments

संताच्या चरणावर  मस्तक ठेवले तर मानवी जीवन धन्य होतो. ह.भ.प.रामदास भाई महाराज पाटील