ग्रामविकास अधिकारी सचिन कुराडे यांचा ग्रामनिधीवर डोळा,रक्षक बनला भक्षक,लाखो रुपयांचा केला भ्रष्टाचार
माय मराठी न्युज : वृत्तसेवा
चौक ,तुपगांव : २८ जुलै,
ग्रुप ग्रामपंचायत तुपगाव कार्यरत असलेले विद्यमान ग्रामविकास अधिकारी,सचिन कुराडे यांनी स्वतःच्या लाभासाठी संबंधित व्यवसायीकाला ग्रामपंचायत ऑडिट असल्याकारणाने, तसेच ग्रामपंचायत अधिकृत बँक खात्याचे तांत्रिक कारणामुळे बंद असल्याने संबंधित बिल्डर ला माझ्या बॅंकेच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्यांसाठी सांगितले .मात्र आपण भरलेला करामुळे आपली फसवणूक होवू नये यासाठी संबधित बॅक ची स्टेटमेंट जे.एम. डेव्हलपर्स यांने अर्ज करुन ग्रुप ग्रामपंचायत यांस कळविले
ग्रामविकास अधिकारी यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग व गैरवापर करून ग्रामनिधीचा अपहार करून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याप्रकरणी तुपगांव ग्रामपंचायत ग्रामविकास अधिकारी, यांच्यावर त्वरित फौजदारी गुन्हा दाखल अश्या असेचे निवेदन गटविकास अधिकारी,पोलीस निरीक्षक,खालापूर यांस गजानन साळवी,व सुरेश गावडे यांनी दिले.भष्टाचार करण्या-यावर त्वरीत फौजदारी गुन्हा दाखल करण्यांचे निवेदनात म्हटले आहे.
ग्रामपंचायत सरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच दरमहा मासिक मीटिंगमध्ये सहभागी होणारे अन्य ग्रामस्थ यांना अंधारात ठेवून ग्रामपंचायत हद्दीतील में. जे.एम. डेव्हलपर्स या बिल्डर कडून व्यवसायाकडून इमारतीचे कर आकारण्यासंबंधीत / घरपट्टी व पाणीपट्टी संबंधित असेसमेंट तयार,करण्यांसाठी लागत असलेला शासकीय ग्रामनिधीचा अपहार करून रुपये १,३०,९८१ अदि रक्कम ग्रामविकास अधिकारी यांच्या खात्यात जमा केली असल्यांचे समोर आले.आपल्या पदाचा गैरवापर करणाऱ्या भ्रष्ट ग्रामविकास अधिका-यावर निलंबनाची कारवाई करण्यांची मागणी सर्वसामान्यकडून होत आहे.
0 Comments