विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी रॅली, पुष्पगुच्छ आणि ‘पहिले पाऊल’ उपक्रम,
राजिप शाळा माजगाव यांचा स्तुत्य उपक्रम
राजिप शाळा माजगाव येथे शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आला.नविन विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी गावातून भव्य रॅली काढून, दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनातील पहिला दिवस स्मरणात रहावे यासाठी ‘शाळेतील पहिले पाऊल’ हा अनोखा उपक्रम राबविण्यात आला. नवागत विद्यार्थ्यांच्या पायांचे ठसे कागदावर उमटवून त्यांचे स्वागत करण्यात आले.
यावेळी इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांना शासनाकडून उपलब्ध करून देण्यात आलेली मोफत पाठ्यपुस्तके आणि गणवेशांचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यावर शाळेचा भर असल्याचे यावेळी सांगण्यात आले.कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात मुख्याध्यापक सुनील सातुनकर यांनी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हेच शाळेचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमाला सरपंच दिपाली पाटील,उपसरपंच वंदना महाब्दी, सदस्य राजेश पाटील, नरेश पाटील, सूर्यकांत कांबळे, केंद्रप्रमुख जे.पी.परदेशी तसेच ग्रामस्थ व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.हा कार्यक्रमाच्या यशस्वी करण्यासाठी शिक्षक सोहाली सातुनकर, भूषण पिंगळे, अर्चना शेलार आणि घनशाम तिखंडे यांनी विशेष परिश्रम घेतले.



0 Comments