राष्ट्रीय समाज पक्षाच्या मावळ लोकसभा अध्यक्षपदी सुखदेव खांडेकर यांची निवड
माय मराठी न्युज : दत्तात्रय शेडगे
खोपोली : २६ मे,
राष्ट्रीय समाज पक्षाच्या मावळ लोकसभा मतदार संघाच्या अध्यक्षपदी सुखदेव खांडेकर यांची नुकतीच निवड झाली आहे.
राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी मंत्री महादेव जानकर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात राष्ट्रीय समाज पक्षाने पुन्हा एकदा जोरदार संघटना बांधणीसाठी प्रयत्न चालू केले असून मावळ लोकसभा मतदार संघातही जोरदार मोर्चे बांधणी केली आहे.त्यातच आता मावळ लोकसभा मतदार संघाच्या अध्यक्ष पदी युवा नेते सुखदेव खांडेकर यांची नुकतीच निवड करण्यात आली.त्यांना नियुक्ती पत्रक राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी मंत्री महादेव जानकर यांच्या आदेशाने महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य तथा कोकणचे नेते भगवान ढेबे यांच्या हस्ते देण्यात आले.
रासप नेते सुखदेव खांडेकर यांची निवड होताच सर्वच स्तरातून त्यांचे अभिनंदन होऊन त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
0 Comments