पावसाळ्यात वाढलेले गवताची छाटणी करुन ग्रामस्थांना दिलासा,मा.सरपंच गोपीनाथ जाधव यांचा पुढाकार
माय मराठी न्युज : वृत्तसेवा
माजगाव /आंबिवली ३ ऑगस्ट
ग्रुप ग्राम पंचायत माजगाव या परिसरात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात गवत निर्माण झाले होते.त्याच बरोबर सर्पटणा-या सापाची भिती मोठ्याप्रमाणात असल्यामुळे विद्यमान सरपंच याकडे साफ दुर्लक्ष करीत असल्यामुळे ही समस्या मा.सरपंच गोपीनाथ जाधव यांच्या पुढे सादर केली.मात्र सार्वजनिक ठिकाणी होत असलेल्या समस्या विचारात घेत आंबिवली येथिल स्मशान भुमीकडे ,जाणा-या रस्त्यावरील गवत छाटणी करण्यांत आली.तसेच अदिवासी शाळा,पौध बस स्टॉप,अदिवासी विहीरीवर जाणारा रस्ता आश्या अनेक ठिकाणी त्यांनी गवत छाटणी करुन स्वच्छता मोहीम राबविली.
पद नसतांही समाजकारण करण्यांची तळमळ मा.सरपंच गोपीनाथ जाधव यांच्या मध्ये पहावयांस मिळाली.विशेष म्हणजे स्व:खर्चा या ठिकाणी मजूर लावून स्वताच्या उपस्थितीत ही कामे करुन घेतली.या मार्गावरुन जात असतांना त्यांना होत असलेली समस्या विचारात घेत हा उपक्रम हाती घेण्यांत आला.त्यांच्या मध्ये असलेली कामाची तळमळ पाहताच त्यांच्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे.
त्याच या ग्राम पंचायत परिसरात आमदार महेश बालदि यांच्या माध्यमातून महिला सक्षमिकरण करण्यांसाठी,त्याच बरोबर त्यांच्या कुटुंबाला हातभार लागावा,या विचारांतून महिला वर्गांस शिलाई मशिन,तसेच घरघंटी वाटप करण्यांचा कार्यक्रम हाती घेण्यांत येणार असल्यांचे बुथ अध्यक्ष कल्पेश सं.जाधव यांच्या प्रयत्नातून हा उपक्रम हाती घेण्यांत येणार असल्यांचे समजते.
0 Comments