खोपोलीतील खड्यात झाडे लावत आम आदमी पार्टीने केले अनोखे आंदोलन .... खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करून देणार अधिकाऱ्यांचे व नेत्यांचे नाव

 


खोपोलीतील खड्यात झाडे लावत आम आदमी पार्टीने केले अनोखे आंदोलन .... खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करून देणार अधिकाऱ्यांचे व नेत्यांचे नाव


दत्तात्रय शेडगे 
खोपोली : २४ जुलै,
            
             आम आदमी पार्टी तर्फे राज्यातील प्रमुख रस्त्यांवर पडलेल्या मोठ मोठ्या खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करून "भ्रष्टाचाराचा खड्डा" असे एक अनोखे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. सदर खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करून अधिकाऱ्यांचे व नेत्यांचे नावे देऊन पक्षाचे कार्यकर्ते राज्यभर आंदोलन करीत आहेत. 
            भ्रष्टाचारामुळेच कमकुवत दर्जाचे रस्ते बनवतात व त्यामुळे पावसाळ्यात मोठे मोठे खड्डे होतात त्यामुळे अपघातही होतात व नाहक सामान्य नागरिकांचा बळी जातो. शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आम आदमी पार्टी खोपोली खालापूर तर्फे भ्रष्टाचाराचा खड्डा आंदोलन करण्यात आले आहे असे डॉ. रियाज पठाण राज्य संघटन सचिव यांनी सांगितले आहे. 
           मुंबई पुणे महामार्गावर जिओच्या केबल टाकण्याच्या कामामुळे मोठे मोठे खड्डे पडले होते त्याबाबत आम्ही प्रशासनाबरोबर पत्र व्यवहार सुद्धा केला होता त्यावेळी त्यांनी काही खड्डे तर बुजवले परंतु अजूनही काही खड्डे आहेत व पावसामुळे सदर खड्डे खूप मोठे झालेले आहेत. अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. अपघात होऊन जीवित हानी झाल्यानंतर मदत करण्यापेक्षा अपघात होऊ नये त्यासाठी प्रशासनाने ताबडतोब सदर खड्डे बुजवावे असे आम आदमी पार्टी खालापूर तालुका अध्यक्ष डॉ. शेखर जांभळे यांनी सांगितले.
                सदर आंदोलनात रॉबर्ट गौडर,कविता खरे,खोपोली शहर अध्यक्ष ग्यासुद्दिन खान,शिवा शिवचरण,दीपक कांबळे चंद्रप्रकाश उपाध्याय, शादाब सय्यद,प्रसन्न त्रिभुवन, मैनुद्दीन बागवान व इतर सदस्य उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

ग्रामीण रुग्णालय चौक येथे लहान मुलांची आरोग्य तपासणी,मार्गदर्शन शिबीर