उत्तर भारतीय बांधवांचे सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक राजेश पाण्डेय यांना वाढदिवसानिमित्त मान्यवरांनी दिल्या शुभेच्छा

 


उत्तर भारतीय बांधवांचे सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक राजेश पाण्डेय यांना वाढदिवसानिमित्त मान्यवरांनी दिल्या शुभेच्छा


संजय कदम 
पनवेल : २५ जुलै,
  
               पनवेल, कळंबोली व खारघर विभागातील उत्तर भारतीय बांधवांच्या अनेक समस्यांना मदतीला धावून जाणारे तसेच कळंबोली परिसरात राहणारे सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक राजेश पाण्डेय यांचा वाढदिवस आज समाजबांधवांसह, विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांनी शुभेच्छा देऊन साजरा केला. 
               राजेश पाण्डेय यांना वाढदिवसानिमित्त केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, राज्यमंत्री सुरेश खाडे, खासदार राहुल शेवाळे, खासदार गजानन कीर्तिकर यांनी शुभेच्छा पत्र पाठवून त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. दरम्यान राजेश पाण्डेय यांच्या वाढदिवसानिमित्त अन्नदान, वृक्षारोपण, शैक्षणिक साहित्याचे वाटप असे विविध सामाजिक कार्यक्रमाचे उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमांना राजेश पाण्डेय यांनी भेट देऊन गरीब व गरजूना साहित्याचे वाटप केले.

Post a Comment

0 Comments

ग्रामीण रुग्णालय चौक येथे लहान मुलांची आरोग्य तपासणी,मार्गदर्शन शिबीर