चिंचवली येथे शासकीय दाखले व आधार कार्ड शिबिर संपन्न,अमोलभाई जाधव सामाजिक प्रतिष्ठाणचा स्तुत्य उपक्रम
समाधान दिसले
खालापूर : ३१ जुलै,
खालापूर तहसील कार्यालय व अमोलभाई जाधव सामाजिक प्रतिष्ठाण यांच्या संयुक्त विदयमाने नगरसेवक अमोल जाधव यांच्या वाढदिवसाचे औचत्य साधत शासकीय दाखले व आधार कार्ड शिबीर रवीवार 30 जुलै रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर प्राथमिक शाळा क्र.9 चिंचवली शेकिन येथे आयोजित करण्यात आले होते. यावेळी ज्येष्ठ नागरिक कार्ड, आर्थिक दुर्बल प्रमाणपत्र, जातीचा दाखला, नवीन मतदार नोंदणी, नाँन क्रिमिलेयर प्रमाणपत्र, उत्पनाचा दाखल, शिधापत्रिका, वय, डोमिसाईल प्रमाणपत्र व आधार कार्ड शिबीर पार पडल्याने अमोलभाई जाधव सामाजिक प्रतिष्ठाणच्या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक होत आहे.
याप्रसंगी सर्व पक्षीय नेते - कार्यकर्ते, सामाजिक - वारकरी - शैक्षणिक मंडळीसह मोठ्या संख्येने परिसरातील नागरिक उपस्थित होते.तर शिबीर यशस्वी करण्यासाठी चंद्रकांत फावडे, नामदेव मोरे, रमेश.ह.जाधव, सचिन गायकवाड, संदेश पाटील, किरण रोकडे, रवींद्र नवले, तुषार हजारे, संतोष म्हामुनकर, अनिल निकम, मंगेश जाधव, संतोष उतेकर, योगेश जाधव, राजेश धाद्रून, अतुल जाधव, विक्रम जाधव, प्रथमेश रोकडे, विकास पडवळ, अनिल मोरे, विनोद रोकडे आदीप्रमुखांनी मेहनत घेतली असून हे शिबीर स्वातंत्र्यवीर सावरकर प्राथमिक शाळा क्र. 9 चिंचवली शेकिन येथे पार पडले.
खोपोली नगर पालिकेचे नगरसेवक अमोल जाधव हे वर्षभर अमोलभाई सामाजिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून विविध सामाजिक कार्य हाती घेत गोरगरीबांना मदत करून सामाजिक कार्यक्रमातून समाज प्रबोधनाचे कार्य ही करीत असल्याने अमोल जाधव यांच्या सामाजिक कार्याचे सर्व गोरगरिबांना आदर्श वाटत आहे. तर नगरसेवक अमोल जाधव यांनी 30 जुलै रोजी आपल्या वाढदिवसादिनी कोणताही वायफळ खर्च न करता, तोच वायफळ खर्च समाजसेवेसाठी खर्ची केल्याने या माध्यमातून असंख्य गोरगरिबांना मदतीचा मिळाला आहे.
तर नगरसेवक अमोल जाधव जाधव यांनी आपल्या वाढदिवसादिनी शासकीय दाखले व आधार कार्ड शिबीराचे आयोजन केल्याने नगरसेवक अमोल जाधव यांच्या उपक्रमाचे अनेकांनी कौतुक केले
0 Comments