स्थलांतरित माडभुवनवाडी आदिवासी बांधवांची माजी आमदार मनोहर भोईर यांनी घेतली भेट

 


स्थलांतरित माडभुवनवाडी आदिवासी बांधवांची  माजी आमदार मनोहर भोईर यांनी घेतली भेट 

       
 दत्तात्रय शेडगे  
खालापूर : ३१ जुलै,

                 रायगड जिह्यात  सुरू असलेल्या अतिृष्टीमुळे आपटा ग्रुप ग्रामपचायत हद्दीतील सारसई माडभुवनवाडी येथील डोंगराला तडा जाऊन २ मीटर भेगा गेल्या असल्याने तेथे धोकादायी परिस्थिती निर्माण झाली आहे व कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता तेथी गावकऱ्यांना प्रशासनाने स्थलांतरित करून  कर्नाळा गारमेंट कंपणी येथे स्थलांतरित करण्यात आलेले आहे.यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख मा. आमदार मनोहरशेठ भोईर  यांनी या माडभुवनवाडीला  भेट देऊन तेथील ग्रामस्थांना मदतीचा हात देऊन धीर दिला आहे, 

            तसेच त्यांच्या करमणूकीसाठी  ५२  इंच टीव्ही व टाटा स्कायची व्यवस्था व २५  खुर्च्या दिल्या आहेत, त्याचप्रमाणे मा आमदार मनोहर  भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना पनवेल तालुका यांच्या वतीने त्यांना रोज जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. या अगोदर त्यांना  गरजू वस्तू लागणारी ताडपत्री  आपटा ग्रामपंचायत सदस्या संगीता लक्ष्मण बावदाणे व अधक्ष पनवेल तालुका धनगर समाज  लक्ष्मण बावदाणे यांच्या वतीने देण्यात आले आहे.

                यावेळी मा.आमदार  मनोहरशेठ भोईर यांच्या समवेत पनवेल तालुकाप्रमुख  रघुनाथ भोईर, तालुका सहसंपर्कप्रमुख  प्रताप हातमोडे, तंटामुक्ती अध्यक्ष महेंद्र गायकर,  निलेश बाबरे,  लक्ष्मण  बावदाणे, तुकाराम गायकवाड,  पंचायत समिती सदस्य श्री ज्ञानेश्र्वर मोरे, डॉ. आरिफ दाखवे, आपटा ग्रामपंचायत उपसरपंच  मयूर शेलार, सदस्य दामू माडे, राजू देशमुख पांडुरंग लेंडे  समाधान गावंड , अनिल सिद्ध  व कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

ग्रामीण रुग्णालय चौक येथे लहान मुलांची आरोग्य तपासणी,मार्गदर्शन शिबीर