अलिबाग येथे 'आप' ची रायगड जिल्हा सदस्य बैठक संपन्न,लवकरच होणार नवीन जिल्हा कार्यकारिणी जाहीर
दत्तात्रय शेडगे
खोपोली : १४ जुलै,
आम आदमी पार्टी महाराष्ट्रात निवडणुकांच्या अनुषंगाने जोरदार तयारीला लागलेली असून नुकतीच महाराष्ट्र राज्याची कॅम्पेन कमिटी जाहीर झालेली आहे. डॉ.रियाज पठाण यांना कोकणातील रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांमध्ये पक्ष विस्तार करण्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे.
सदर पक्ष विस्तार कार्यक्रमांतर्गत अलिबाग येथील थळ येथे आम आदमी पार्टी रायगड जिल्हा सदस्यांची बैठक घेण्यात आलेली असून सदर बैठकीत पक्षासाठी पूर्ण वेळ देणारे व पक्ष वाढवण्यासाठी संघटन कौशल्य, दांडगा जनसंपर्क असणाऱ्या अशा सदस्यांना प्रोत्साहित करण्यात आले असून लवकरच जिल्ह्याची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात येणार आहे.
सदर बैठकीला राज्य संघटन सचिव डॉ.रियाज पठाण यांनी मार्गदर्शन केले जिल्हा सचिव जयसिंग शेरे यांनी सूत्रसंचालन केले व जिल्हाध्यक्ष मनोज घरत यांनी संबोधित केले. सदर बैठकीला संघटन मंत्री हरिश्चंद्र शिंदे, खालापूर तालुका अध्यक्ष शेखर जांभळे, खोपोली शहराध्यक्ष ग्यासुद्दीन खान, श्रीकांत शिंदे, फ्लोरिना परूळेकर, वैशाली कोळी, राहुल कासारे, सुनील माळी, जयश्री पाटील, वैशाली झाओ, अनिल थोरात, संदीप घाडी, प्रकाश ठाकूर, गणेश ठाकूर, संतोष भगत, मनीष चव्हाण, राजेंद्र वाघ, फैजल महाडकर, अशोक रायकर, इरफान शेख आदी सदस्य उपस्थिती होते.
0 Comments