शिवजयंती निमित्ताने शिवकन्या यांचे हस्ते शिवज्योत प्रज्योलीत,

 शिवजयंती निमित्ताने शिवकन्या यांचे हस्ते शिवज्योत प्रज्योलीत,

रायगड वरून निघालेली शिवज्योत शेतपळस गावी स्थिरावली 

माय मराठी न्युज : वृत्तसेवा 
शेतपळस : ६ मार्च,




          हिंदूचे आराध दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली रायगड भूमी, तसेच स्वराज्याची राजधानी असलेला रायगड किल्ला येथे शिवजयंती निमित्ताने शिवज्योत प्रज्योलीत करून  शेतपळस या मूळ गावी घेऊन आल्यामुळे  शिवभक्त व शिवकन्या यांचे कौतुक होत आहे.आपल्या राजाची तिथीप्रमाणे जयंती असल्यामुळे तरुण वर्गाने एक आठवडा अगोदरच तयारी सुरू असलेली पहावयास मिळाले.
              दर वर्षी तिथी प्रमाणे येत असलेली शिवजयंती शिवभक्त मोठ्या उत्साहाने साजरी करत असतात.या वर्षी शेतपळस या गावातील शिवकन्या यांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात लाभलेली पहावयास मिळाली.आकादेवी च्या कृपा आशीर्वादाने गेली अनेक वर्ष शिवभक्त मोठ्या उत्साहाने शिव जयंती साजरी करीत असतात.यावेळी स्वराज्याची राजधानी रायगड वरून शिवज्योत आपल्या मूळ गावी शेतपळस या ठिकाणी आणण्यात आली.गुरुवारी सर्व शिव भक्त या ठिकाणी पोहचले तसेच शुक्रवारी पुन्हा ही शिवज्योत आपल्या मूळ गावी शेतपळस या ठिकाणी आणण्यात आली.
             या शिवजयंती उत्सवाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.शिवज्योत मिरवणूक,शिवपुजा व सत्यनारायण पूजा, तसेच सायंकाळी ह.भ.प. तुकाराम महाराज कोलेटी यांचे हरिपाठ,नेत्रा माळी यांचे संगीत भजन, तसेच मराठी शाळेंच्या जीवनपटावर आधारीत क्रांतीज्योती विदयालय (मराठी माध्यम) चित्रपटाचे आयोजन करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments

शिवजयंती निमित्ताने शिवकन्या यांचे हस्ते शिवज्योत प्रज्योलीत,