डॉ.पठाण यांची आपच्या राज्य संघटन सचिव पदी नियुक्ती,कोकणातील रायगड,रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पक्ष विस्ताराची जबाबदारी



दत्तात्रय शेडगे 
खोपोली : १२ जुलै,

                 आम आदमी पार्टी महाराष्ट्र राज्य समितीची घोषणा करण्यात आली असून राष्ट्रीय अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांच्या आदेशाने व राष्ट्रीय संघटन महामंत्री डॉ. संदीप पाठक, महाराष्ट्र राज्य प्रभारी दीपक सिंगला व सह प्रभारी गोपाल इटालिया जी यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. रियाज पठाण यांना महाराष्ट्र राज्य संघटन सचिव पदाची जबाबदारी देण्यात आली असून कोकणातील रायगड रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये पक्ष विस्तार करण्याची खूप मोठी जिम्मेदारी त्यांना देण्यात आली आहे.
                 डॉ. पठाण हे आम आदमी पार्टीचे फौंडर सदस्य असून दहा वर्षापासून पक्षाची सेवा करीत आहे तसेच या अगोदर सुद्धा त्यांनी राज्य समितीमध्ये काम केलेले आहे. आता पक्ष खूप जोमाने वाढत आहे व महाराष्ट्रात एक खूप मोठी राजकीय पोकळी निर्माण झालेली आहे. त्यामुळे पक्ष वाढीसाठी एक अनुकूल वातावरण निर्माण झालेले आहे. आता फक्त पक्ष प्रत्येक गावात प्रत्येक शहरात पोहोचण्याची आमची जिम्मेदारी आहे. ते आम्ही नक्कीच करू असे डॉ. पठाण यांनी सांगितले.
                  कोकणातील रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात 30 सदस्यांची सक्रिय कार्यकारिणी बनवून पक्षाचे संगठन बळकट करणार आहोत तसेच प्रत्येक तालुक्यात, जिल्हा परिषद, पंचायत समिती, वॉर्डात, गावात ते बूथ पर्यंत संगठन बांधणी करणार आहोत असे त्यांनी सांगितले.
कोकणातील नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की स्वच्छ, पारदर्शी राजकारण पाहिजे असेल तर आम आदमी पार्टीला आपण सर्वांनी साथ द्या व पक्ष वाढीसाठी मदत करा आपल्याला योग्य मानसन्मान जरूर मिळेल.

Post a Comment

0 Comments

मराठा,कोळी,आगरी,अदिवासी यांची भर सभेत इज्जत काढत असलेला आमदार यांची जागा दाखवून द्या : प्रितम जे. एम.म्हात्रे