टी.एन.एम.पब्लिक स्कूल असरोटी,विद्यालयाचे काम कौतुकास्पद नंदकुमार वाळंज

  टी.एन.एम.पब्लिक स्कूल असरोटी,विद्यालयाचे काम कौतुकास्पद नंदकुमार वाळंज 


क्रीडा,तसेच विविध स्पर्धेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांस मान्यवरांच्या हस्ते सन्मानित


 माय मराठी न्यूज : वृत्तसेवा 
असरोटी चौक : २४ मार्च,
      
          असरोटी येथिल ग्रामीण भागामध्ये इंग्रजी शाळा निर्माण करून, विद्यार्थ्यांना घडविण्याचे काम संतोष मुंढे करीत आहेत.२०१०  विद्यालयाची स्थापना करून शिक्षणाचे रोपटे लावण्यात आले.आज १६ वर्ष पूर्ण झाली असून अनेक विद्यार्थी या शाळेतून शिक्षण घेवून गेले आहे.  इंग्रजी शिक्षण ही काळाची गरज असून शिक्षणासमवेत खेळण्यांचे कौशल्य असणे महत्वाचे आहे.यामुळेच टी.एन.एम.पब्लिक स्कूल अर्थात कै.ताराबाई नारायण मुंढे,सामाजिक व शैक्षणिक संस्था असरोटी विद्यालयाचे काम कौतुकास्पद असे मनोगत क्रीडा स्पर्धेच्या बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमात नंदकुमार ( बाबुजी )वाळंज,संस्थापक अध्यक्ष कोराईगड शिक्षण संस्था मुळशी,पुणे यानी व्यक्त केले.
             


 दर वर्षी या शाळेमध्ये विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात येत असते.या क्रिडा क्षेत्राबरोबर अन्य उपक्रम राबविण्यात आले.यावेळी,उंचउडी ,थाळी फेक,गोला फेक,शंभर -चारशे  मिटर धावणे,हिंदी राष्ट्र भाषा स्पर्धा, हॉली बॉल,खोखो, कबड्डी,बास्केट बॉल,तसेच चित्रकला, निबंध, विविध पोस्टर,अशा विविध स्पर्धांचे आयोजन शाळेच्या वतीने करण्यात आले.यावेळी विद्यार्थी ने  मोठ्या उत्साहाने सहभाग घेवून आपली कला सादर करण्यात आली होती.यावेळे विविध स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह,सन्मान पत्र,मेडल देवून गौरविण्यात आले.यावेळी या कार्यक्रमास त्यांचे पालक वर्ग उपस्थित होते.   

                          
                     या कार्यक्रमास,अध्यक्ष : संतोष नारायण मुंढे ,उपाध्यक्ष : सुभाष मुंढे, सचिव - कृष्णा गोरे , अदि शाळेय कमिटी यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.तसेच मान्यवर म्हणून  सविता अग्रवाल,सुप्रिया गायकर,महादू मुंढे,सुलभा पालकर,बापूलाल तारे,विनय जॉन,सूर्यकांत लोते,गिरीश जाधव,गीता गायकवाड, ग्रुप ग्रामपंचायत टेंभरी  सरपंच - रमेश गायकवाड, उपसरपंच मिताली बामणे आदि उपस्थित होते.








Post a Comment

0 Comments

टी.एन.एम.पब्लिक स्कूल असरोटी,विद्यालयाचे काम कौतुकास्पद नंदकुमार वाळंज