खालापूर मध्ये वंचित बहुजन आघाडी शाखा उद्घाटन व नामफलक अनावरण सोहळा उत्साहात संपन्न "गाव तेथे शाखा, गाव तेथे कार्यकर्ता" उद्देशासह वंचित बहुजन आघाडीला खालापूरात नव-संजीवनी.

 


दत्तात्रय शेडगे 
खालापूर : १२ जुलै,

              राज्यात चाललेल्या सत्ता संघर्षात जनतेच्या विकासाचा मूलभूत विचार बाजूला सारून राज्यकर्ते स्वतःचा फायदा करून घेण्यात मश्गूल असताना वंचित बहुजन आघाडी सारखा स्वाभिमानी बाणा असलेला पक्ष जनतेच्या पसंतीस उतरत आहे.   खालापूर तालुक्यात वंचित बहुजन आघाडीच्या शाखा उद्घघाटन व नामफलक अनावरण कार्यक्रम नुकताच पार पडला.
             तालुक्यातील विविध गावात शाखा स्थापने सह नाम फलकाचे अनावरण वंचित बहुजन आघाडी रायगड जिल्हा अध्यक्ष (उत्तर) प्रदीप ओव्हाळ , जिल्हा महासचिव वैभव केदारी , युवा जिल्हा अध्यक्ष अमित गायकवाड यांच्या हस्ते केले असल्याचे तालुका अध्यक्ष प्रवीण भालेराव यांनी माहिती दिली.
               वंचित बहुजन आघडीचे सर्वेसर्वा ॲड प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडवण्याचा चंग उराशी बाळगून तालुक्यात मरगळलेळी वंचित पुन्हा सतेज करत गांव तेथे शाखा स्थापन करून पुढील आगामी होणाऱ्या निवडणुकीत सत्ता स्थापन करण्यासाठी प्रदीप ओव्हाळ यांच्या मार्गदर्शनाखाली खालापूर तालुका अध्यक्ष प्रवीण भालेराव यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील विविध गावात शाखा स्थापनेसह गावात नामफलक अनावरण कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता.
                 खालापूर तालुक्याच्या वंचितच्या इतिहासात पहिल्या टप्यात प्रथमच तालुक्यात मोठया प्रमाणात गाव तेथे शाखा उघडली जात आहे. त्यामुळे आता खालापूर तालुक्यामध्ये वंचितला राजकीय संजीवनी प्राप्त होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
वंचित बहुजन आघाडी राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात तसेच रायगड जिल्हा अंतर्गत खालापूर तालुका मधील आडोशी, कलोते, कुंभिवली, चिलठण, या गावांमध्ये ग्रामशाखा नामफलकाचे उदघाटन प्रसंगी प्रमुख उदघाटक रायगड जिल्हा अध्यक्ष ( उत्तर ) प्रदीप परशुराम ओव्हाळ तसेच प्रमुख उपस्थिती जिल्हा महासचिव वैभव केदारी ,जिल्हा युवक अध्यक्ष अमित गायकवाड ,जिल्हा सल्लागार प्रकाश गायकवाड , जिल्हा संघटक आशिष जाधव उपस्थित होते.
             शाखा उद्घाटन प्रसंगी रायगड जिल्हा युवक अध्यक्ष अमितजी गायकवाड साहेब यांनी "इतर पक्षांत भरकटलेल्या तरुणांनी ॲड. बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडीत सामील व्हा" असे आवाहन केले आहे.
तसेच खालापूर तालुका अध्यक्ष प्रवीण भालेराव यांनी "येत्या काळात शोषित, पिडीत, वंचित, शेतकरी, कामगार, महिला आणि सर्व जाती धर्माच्या लोकांना पक्षाच्या माध्यमातून मदत करणार असल्याचे देखील यावेळी त्यांनी सांगितले.
              खालापूर तालुका मधील ग्रामशाखा नामफलकाचे उदघाटन आयोजन खालापूर तालुका अध्यक्ष प्रवीण भालेराव यांचा मार्गदर्शना खाली तालुका पदाधिकारी तालुका युवक अध्यक्ष प्रशांत गायकवाड, तालुका सच,व ऋतिक गायकवाड, तालुका महासचिव उत्तम ओव्हाळ ,तालुका संघटक सुमेध जाधव तालुका संघटक दिलीप गायकवाड, तालुका युवा महासचिव महेंद्र ओव्हाळ , तालुका युवा उपाध्यक्ष रोहित पवार ,तालुका युवा उपाध्यक्ष रोशन गायकवाड यांनी हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी विशेष मेहनत घेतली 
               तसेच नवीन शाखा अध्यक्ष अडोशी शाखा अध्यक्ष्य राजेंद्र भालेराव व शाखा पदाधिकरी, कलोते शाखा अध्यक्ष आकाश गायकवाड व पदाधिकारी, कुंभीवाली शाखा अध्यक्ष संजय गायकवाड व पदाधिकरी, चिलठण शाखा अध्यक्ष कैलास ओव्हाळ व पदाधीकरी यांच्या पुढाकारने शाखा नामफलक उद्घाटनाचे कार्यक्रम पार पाडले त्या प्रसंगी स्थानिक महिला मोठया संख्येने उपस्थित होत्या.

Post a Comment

0 Comments

मराठा,कोळी,आगरी,अदिवासी यांची भर सभेत इज्जत काढत असलेला आमदार यांची जागा दाखवून द्या : प्रितम जे. एम.म्हात्रे