पावसाची सर आली धावून निगडोली - चौक रस्ता गेला वाहून,अनेक ग्रामीण भागातील रस्त्याची दुरवस्था

 


पावसाची सर आली धावून निगडोली - चौक रस्ता गेला वाहून,अनेक ग्रामीण भागातील रस्त्याची दुरवस्था 


पाताळगंगा न्यूज  : वृत्तसेवा  
निगडोली  : २० जुलै,
      
             गेले दोन ते तीन दिवस पाऊस सातत्याने पडत असल्यामुळे अनेक समस्या निर्माण  झाल्या आहेत.पाताळगंगा नदि च्या मार्गातून वाहत जाते. त्या बाजूनी अनेक गावे आहेत.शिवाय या गावांना जोडणारे रस्ते आहेत.मात्र पावसामुळे या रस्त्यांची दाणादाण उडवून दिली आहे.निगडोली - चौक या मार्गासाठी असलेला रस्ता पावसाच्या पाण्याने वाहून गेल्यामुळे दळण - वळण साधणांसाठी येथिल ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागेल.विशेष म्हणजे या मे महिन्यात या रस्त्याच्या काम करण्यात आले होते. मात्र आता या रस्त्याची दुरवस्था निर्माण झाली आहे.
                 

 निगडोली तसेच या परिसरातील अनेक नागरिक चौक या बाजार पेठेत जाण्यासाठी या पर्यायी मार्गाचा अवलंब केला जात होता.मात्र पावसांचा प्रवाह येवढ्या तीव्रतेने असल्यामुळे या पाताळगंगा नंदिचे पाणी रस्त्यावरील माती ,डांबर वाहू गेल्यामुळे रस्त्याची दुरवस्था निर्माण झाली आहे.शिवाय याच मार्गावरून या परिसरातील शाळकरी मुळे चौक येथे शिक्षण घेण्यासाठी य रस्त्याचा अवलंब केला जात होता.मात्र या पावसांन खूप काही हिरावून घेतल गेल आहे.

            या पावसांने रस्त्याची दुरवस्था निर्माण केलीच, मात्र शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्यांचे निदर्शनास येत आहे.त्याच चौक येथिल इरसालगडाच्या पायथ्याशी असलेली इरसाळवाडी येथे दरड कोसळयांने अनेक माणसे ठिगा-या गाडली गेली आहे,त्यातच अनेक नागरिकांना आपला जिव गमवावा लागला. मात्र १९  जुलै महिन्यातील झालेला पाऊस मानवी मनाला सातत्याने आठवण करुन देत राहिल,हे मात्र निश्चित 


चौकट 
      पाताळगंगा या किनाऱ्या लगत निगडोली गाव असून चौक या बाजारपेठ जाण्यासाठी डांबरीकरण रस्ता नुकसाच मे महिन्यात या ठिकाणी मो-या बसविण्यात आले,असून रस्त्याची डागडुगी करण्यात आली.मात्र पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात असल्यामुळे रस्त्यावरील माती - डांबर वाहून जावून या रस्त्याची दुरवस्था निर्माण झाली आहे.
   ( सुरेश ठोंबरे  - निगडोली पोलीस पाटील )

Post a Comment

0 Comments

विकास कामाच्या जोरावर महेश बालदि पुन्हा आमदार होणार मा.सरपंच माजगांव- गोपीनाथ जाधव