पाताळगंगा न्यूज : वृत्तसेवा
खोपोली :०७ जुलै,
खरीप हंगाम २०२३ ते २०२४ पासून शासनाने पीक विमा योजना लागू केली असून, शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विम्याचा लाभ मिळणार आहे. शेतकऱ्यांनी प्रति अर्ज फक्त एक रुपया भरावयाचा आहे. एक रुपया वगळता उर्वरित विमा हप्त्याची शेतकरी हिस्स्याची रक्कम राज्य शासनामार्फत भरण्यात येणार आहे. सदर योजना ही २०२३-२०२४ पासून २०२५ - २०२६ या तीन वर्षांसाठी राबवण्यात येणार आहे.
खरीप हंगामातील प्रमुख पिकांसाठी प्रधानमंत्री पिक विमा योजना कृषी विभागामार्फत राबविण्यात येते.असून सन २०२३ - २०२४ पासून सर्व समावेशक पिक विमा योजना लागू करण्यात आली असून, आता शेतकऱ्यांना केवळ एक रुपया भरून पिक विमा पोर्टलवर नोंदणी करता येईल. इलेक्ट्रॉनिक ट्रेकिंग व नाव नोंदणी सुरळीत करण्यासाठी शेतकऱ्यांमार्फत विमा हप्त्याच्या ऐवजी किमान एक रुपयाचे टोकन आकारले जाईल. अधिसूचित घटकातील अधिसूचित पीका करिता पिक विमा लागू राहणार आहे.
यासाठी मिळणार नुकसान भरपाई
सर्व समावेशक पीक विमा योजना खरीप व रब्बी हंगामा करिता खालील बाबींकरिता राबवण्यात येईल. हवामानातील प्रतिकूल घटकामुळे व अपुऱ्या पावसामुळे पीक पेरणी लावणी न झाल्यामुळे होणारे नुकसान.पिकाच्या हंगामामध्ये हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे होणारे पिकांचे नुकसान.
पिंक पेरणी पासून काढणीपर्यंत नैसर्गिक आग वीज कोसळणे गारपीट चक्रीवादळ पूर क्षेत्र जन्म होणे भूस्खलन दुष्काळ पावसातील खंड कीड व रोगाचा प्रादुर्भाव इत्यादींमुळे उत्पन्नात होणारी घट. ( पीक कापणी प्रयोगावरून )
स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान
नैसर्गिक कारणामुळे होणारे काढणीपश्चात नुकसान.
वरील कारणांमुळे नुकसान होऊन पीक उत्पादनात घट झाल्यास शेतकऱ्यांना पिक विमा लागू होईल. रायगड जिल्ह्यासाठी सदरची योजना चोलामंडलम एम. एस. जनरल इन्शुरन्स कंपनी लि. या कंपनीमार्फत राबविण्यात येणार आहे. या योजनेमध्ये शेतकरी पिक विमा पोर्टल, आपले सरकार सेवा सुविधा केंद्र, बँक इत्यादी माध्यमांद्वारे सहभागी होऊ शकतात. पिक विमा योजनेत सहभागाची नोंदणी करण्यासाठी आपले सरकार सेवा केंद्र धारकाला विमा कंपनी मार्फत प्रति अर्ज रक्कम रुपये ४० विमा कंपनीमार्फत देण्यात येणार आहे. त्यामुळे आपले सरकार सेवा केंद्र धारकांनी शेतकऱ्यांना निशुल्क सेवा उपलब्ध करून देण्यासंदर्भात आयुक्त, (कृषी) महाराष्ट्र राज्य, पुणे सुनील चव्हाण यांनी सांगितले आहे. अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पीक घेणारे (कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसह) सर्व शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत. पीक कर्ज घेणाऱ्या आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांना योजनेतील सहभाग ऐच्छिक राहील.
यासाठी आवश्यक कागदपत्रे भात शेतीची नोंद असलेला सातबारा उतारा, आधार कार्ड, बँक पासबुक झेरॉक्स, स्वयंघोषणापत्र तसेच भाडेपट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना पिक विमा पोर्टलवर नोंदणीकृत भाडे करार अपलोड करणे आवश्यक आहे.
पिक विमा योजनेत सहभागासाठी पिक विमा पोर्टल १ जुलै २०२३ पासून कार्यान्वित झाले आहे. या योजनेत सहभागासाठी ३१ जुलै २०२३ ही अंतिम तारीख असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे व भात आणि नागली पिकाखालील क्षेत्राचा विमा काढावा असे आवाहन तालुका कृषी अधिकारी, खालापूर सुनील निंबाळकर यांनी केले आहे.
0 Comments