कृष्णा भोसले
तळा सोनसडे ०१ जुलै
तळा तालुक्यात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव कार्यक्रमांतर्गत दिनांक २५ जून २०२३ ते १ जुलै २०२३ या कालावधीत कृषी संजीवनी सप्ताहचे आयोजन तळा कृषी विभागाकडून करण्यात आले होते या कृषी संजीवनी मोहीम सप्ताहाची सुरुवात गोलवाडी गावापासून करण्यात आली होती या मोहिमेचा समारोप सुद्धा कृषी दिनाचे औचित्य साधून करण्यात आला. कृषी संजीवनी मोहिमे अंतर्गत गोळवाडी, नानवली,पिटसई कोंड,राहाटाड, चोरवली,रोवळा,पन्हेळी,भांनग, वरळ ,कुंभळे,विनावली,गणेशनगर ,पिटसाई,उसर खुर्द,तळा,मालूक,खांबवली, वानतें ,पिटसाई,मजगाव,वाशी हवेली या गावांमध्ये कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले
या कार्यक्रमांतर्गत कृषी पीक तंत्रज्ञान प्रसार,पौष्टिक आहार प्रसार, कृषी महिला शेतकरी सन्मान दिन,जमीन सुपीकता जागृती दिन,कृषी क्षेत्राची भावी दिशा या विषयी व्याख्यानमाला कृषी प्रक्रिया तंत्रज्ञान प्रसार दिन तसेच कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली या कृषी संजीवनी सप्ताहाची सांगता दिनांक १ जुलै २०२३ रोजी मा. स्व. वसंतराव नाईक यांच्या जन्मदिनी कृषी दिन म्हणून पंचायत समिती तळा येथे करण्यात आली
या कार्यक्रमास तालुका कृषी अधिकारी आनंत कांबळे,कृषी अधिकारी प.स. सोंडकर,मंडळ कृषी अधिकारी सचिन जाधव ,वरिष्ठ पत्रकार किशोर पितळे,कृषी पर्यवेक्षक जितेंद्र गोसावी, आत्मा बीतीएम सचिन लोखंडे , बाजीराज शेतकरी मंडळ जिल्हाउपाध्यक्ष भास्कर गोळे,प्रगतशील शेतकरी मोहम्मद परदेशी, कृष्णकांत पवार,विठ्ठल गोडसे ,कृषी सहाय्यक व शेतकरी उपस्थित होते. सर्व प्रथम मा. स्व. वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरवात करण्यात आली तालुक्यातील उत्कृष्ट काम करणारे शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपनी, कृषी उद्योजक, यांचा कार्यक्रमामध्ये सन्मान करण्यात आला या मध्ये स्मार्ट योजने अंतर्गत तालुक्यामध्ये स्थापन होत असलेल्या तळा नव कृषक शेतकरी उत्पादक कंपनी,बळीराजा शेतकरी मंडळ,समर्थ मसाले उदयोग(रमेश पाखंड) सृष्टी काजू प्रक्रिया उदयोग (सुभाष आंबरले),पीक स्पर्धा प्रथम क्रमांक विजेते कृष्णकांत पवार तसेच नावीन्य पूर्ण चिया सिडचे उत्पादन घेणारे विठ्ठल गोडसे यांचा प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला
या नंतर सचिन जाधव यांनी कृषी संजीवनी मोहीम विषयी प्रास्ताविक केले या मध्ये त्यांनी या मोहिमेमध्ये राबवण्यात आलेल्या उपक्रमा विषयी माहिती देताना कृषी संजीवनी मोहिमेच्या माध्यमातून योजना व नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचवता आल्याचे सांगितले तसेच आनंत कांबळे यांनी मा. स्व. वसंतराव नाईक यांनी कृषी क्षेत्रातील त्यांच्या भरीव योगदानाबद्दल माहिती दिली तसेच यंत्राद्वारे भात पुनर्लागवड या परिसंवादाचे आयोजन केले या मध्ये त्यांनी भात शेतीचा उत्पादन खर्च कमी करायचा असेल व मजुरांची समस्येवरती मात करायची असेल तर यंत्राद्वारे भात लागवड करण्याशिवाय पर्याय नसल्याचे सांगितले
या पद्धतीने लागवड केल्यास बियाण्याचा खर्च कमी होऊ शकतो व मजुरीचा देखील खर्च ९०% पर्यंत बचत होऊ शकतो. तसेच रोपांसाठी राब भाजण्याची देखील आवश्यकता नसल्याने तो खर्च देखील वाचतो. अशा पद्धतीने आपण कमीत कमी खर्चात भात शेती करू शकतो आसे सांगितले व भात लावणीच्या वेगवेगळ्या यंत्रांची व ते कश्या प्रकारे कार्य करते याविषयी विस्तृत सादरीकरण केले व त्यावरती असलेल्या अनुदाना विषयी माहिती दिली.
या नंतर चिया सिडचे उत्पादन घेणारे शेतकरी विठ्ठल गोडसे यांनी मनोगत व्यक्त केले व त्यांना चिया सिडचे उत्पादन कसे घेतले उत्पादन किती मिळाले आर्थिक फायदा किती झाला या विषयी अनुभव सांगितले तसेच कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले वरिष्ठ पत्रकार किशोर पितळे यांनी कृषी क्षेत्रास असलेली संधी व महत्व या विषयी मनोगत व्यक्त केले व कृषी विभागाने शेतकऱ्यांना बाजारपेठ उपलब्ध करून घ्यावी असे सुचविले या नंतर बाजीराज शेतकरी मंडळ जिल्हाउपाध्यक्ष भास्कर गोळे यांनी कृषी विभागाने जास्तीत ज्यास्त शेतकऱ्यांशी संपर्क करून योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन केले
या नंतर चेतन वाझे यांनी मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले प्रगतशील शेतकरी मोहम्मद परदेशी यांनी कृषी विभागच्या योजनांचा व नवीन तंत्रज्ञानाचा फायदा शेतकऱ्यांनी घेण्याचे आवाहन केले व उपस्थित शेतकऱ्यांचे आभार व्यक्त करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला या कार्यक्रमास ऑनलाईन पद्धतीने सुद्धा शेतकऱ्यांनी उपस्थिती लावली.
0 Comments