तळोजा वसाहतीमधील भुयारी मार्गावर पाणीच पाणी

 


संजय कदम                                                             पनवेल दि.०१ जुलै 


तळोजा वसाहतीमधील रेल्वे प्रशासनाने कोट्यावधी रुपये खर्च करुनबांधलेल्या भुयारी मार्गात पाच फूट पाणीच पाणी साठत असून या मार्गातील साचलेले पाणी उपसा करण्यासाठी मोटारपंप लावले जातात. मात्र साचणा-या पाण्याचे प्रमाण एवढे मोठे आहे की मोटारपंप निकामी ठरतात. त्यामुळे प्रवाशांना वळसा घेऊन अन्य मार्गाचा अवलंब करावा लागत आहे.                              तळोजा पाचनंद वसाहतीचे प्रवेशव्दार दिवा पनवेल रेल्वे मार्गावर आहे. रेल्वेफाटकाचा अडथळा नको म्हणून येथे भुयारी मार्ग बांधण्यात आला. हा भुयारी मार्ग रेल्वे प्रशासनाने कोट्यावधी रुपये खर्च करुन बांधला आहे. या भुयारी मार्गाचे लवकर बांधकाम कऱण्यासाठी आणि बांधकाम पुर्ण झाल्यावर तो रहदारीस खुला करण्यासाठी नागरिक व राजकीय पक्षांच्या नेत्यांना आंदोलन करण्याची वेळ आली होती. अखेर तीन वर्षापूर्वी हा मार्ग सूरु झाला. परंतू या मार्गातील त्रुटी अजूनही कायम आहेत.                                                       समुद्रसपाटीखाली हा मार्ग बांधल्याने पावसाळ्यात या भुयारी मार्गात पाच फूट पाणी साचते. या मार्गातील साचलेले पाणी उपसा करण्यासाठी मोटारपंप लावले जातात. मात्र साचणा-या पाण्याचे प्रमाण एवढे मोठे आहे की मोटारपंप निकामी ठरतात. वसाहतीचे प्रवेशदारच पाण्याखाली गेल्याने प्रवाशांना वळसा घेऊन अन्य मार्गाचा अवलंब करावा लागत आहे.


Post a Comment

0 Comments

अवघा रंग एक झाला,तळवली वारकरी यांच्याकडून पायी दिंडीचे आयोजन