वेबलिंग द्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांस मार्गदर्शन,कृषी सहाय्यक प्रशांत कदम यांचे शेतकऱ्यांस मार्गदर्शन

 


वेबलिंग द्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांस मार्गदर्शन,कृषी सहाय्यक प्रशांत कदम यांचे शेतकऱ्यांस मार्गदर्शन



पाताळगंगा न्यूज : वृत्तसेवा
माजगांव / आंबिवली  : २९  जुलै,

             शेती हा अर्थशास्त्राचा कणा असे संबोधले जाते.आज तरुण वर्ग शेतीकडे पाठ फिरवत असून नोकरी,अन्य व्यवसायात आपले लक्ष केंद्रित करीत आहे.मात्र शेती टिकली पाहिजे शिवाय पीएम किसान योजने अंतर्गत शेतकरी वर्गांच्या खात्यात थेट रक्कम पोहचली जात असते.नुकताच १४ वा हप्ता संमेलन अंतर्गत वेबलिंग द्वारे माननीय पंतप्रधान मोदीजी साहेबांचे थेट प्रक्षेपण प्रसारण करून उपस्थित शेतकऱ्यांना भात पिक विमा योजना व शासनाच्या विविध योजनांचे मार्गदर्शन केले.हा कार्यक्रम ग्रूप ग्राम पंचायत माजगांव मा. सदस्य रमेश जाधव यांच्या निवास स्थांनी घेण्यात आले.

         हा कार्यक्रम घेण्यामागील एकच उद्दिष्टे की शेती मशागत करुन लागवड केली जावी,शिवाय शेती संबधी विविध योजना शेतकरी बांधव यांच्या पर्यंत पोहचली जावी,शेती ही आधुनिक पद्धतीने न करता तांत्रिक आणी कृषि अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात यावी,तसेच कोणत्याही ऋतू मध्ये काय पिक घावे,मातीची गुणवत्ता तपासली जावी या आदि बाबीचा आभ्यास शेतकरी बांधवांनी करणे गरजेचे आहे असे मार्गदर्शन कृषी सहाय्यक प्रशांत कदम  यांनी शेतकरी वर्गांस दिले.
         हा उपक्रम उपविभागीय कृषि अधिकारी खोपोली नितीन फुलसुंदर, तालुका कृषि अधिकारी खालापूर सुनिल निंबाळकर, मंडळ कृषि अधिकारी खालापूर जे .के .देशमुख,कृषि पर्यवेक्षक चौक नितीन महाडिक,प्रज्ञा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. यावेळी उप सरपंच - सुवर्णा भरत पाटील,उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती खालापूर - जयवंत पाटील,सूर्यकांत कांबळे,सामाजिक कार्यकर्ते - भगवान जाधव,स्मित - संकल्प गार्डन डेव्हलपमेंट - मंगेश पाटील,मा. पोलीस पाटील - काळुराम पाटील,रवि पाटील,वामन कोंडू पाटील,सखाराम जाधव ,पुष्पा ठोंबरे , वर्षा जाधव,महिला बचत गट अध्यक्ष,सी.आर.पी. -कमल जाधव,आशा वर्कर्स - मनिषा जाधव तसेच शेतकरी मोठ्यासंख्येने उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments

ग्रामीण रुग्णालय चौक येथे लहान मुलांची आरोग्य तपासणी,मार्गदर्शन शिबीर