माधवी ताई नरेश जोशी युवा प्रतिष्ठान यांच्याकडून संगणक आणि प्रिंटर,लोकमान्य टिळक मोफत वाचनालय चौक यांस भेट
पाताळगंगा न्यूज : वृत्तसेवा
चौक : २९ जुलै,
चौक हे ऐतिहासिक वारसा असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचे सहकारी सरनौबत नेताजी पालकर यांचे हे जन्म गाव म्हणून प्रसिध्द आहे.अशा या इतिहासकालीन असलेले चौक बाजारपेठ लोकमान्य टिळक मोफत वाचनालय आहे. आज १०३ वर्ष या ग्रंथालय यांना झाली असून,मात्र अधुनिक युगात आपण राहत असतांना संगणकला खूप महत्व या ग्रंथालयाची समस्या विचारांत घेत माधवी ताई नरेश जोशी युवा प्रतिष्ठान यांच्याकडून संगणक आणि प्रिंटर,भेट देण्यात आली.
लोकमान्य टिळक हे स्वर्गवासी झाल्यानंतर ९ ऑगस्ट १९२० रोजी या ग्रंथालयांची स्थापना करण्यात आली.आज या ठिकाणी नियमित वर्तमान पत्रे समवेत विविध प्रकारची पुस्तके या ठिकाणी वाचण्यांस मिळत आहे.जवळ - जवळ १२५०० पुस्तके असून ५५० सभासद संख्या आहे.मात्र आजपर्यंत सर्व नोंद ही रजिस्टर या मध्ये केली जात होती.मात्र आता नविन प्रणाली च्या माध्यमातून संगणक या मध्ये करता येइल,शिवाय कोणत्याही सभासद यांची नोंद करावयास वेळ लागणार नाही.
यावेळी नरेश जोशी, ग्रंथपाल अभिजीत चौधरी, सदस्य सतीश आंबवणे, अशोक चौधरी, राजेन्द्र चौधरी, ऐश्वर्या जोशी,मनोज साखरे, अमित सोनवणे व वाचक वर्ग इतर कर्मचारी वर्ग उपस्थित होते.आताचे युग हे डिजिटल यूग असून वाचन संस्कृती मध्ये आपणांस कोणतेही मदत लागल्यांस सहकार्य केले जाईल,असे आश्वासन यावेळी प्रतिष्ठान च्या वतीने देण्यात आले.
0 Comments