तळा पंचायत समिती व तहसील कार्यालय यांचे वतीने,शासनआपल्या दारी अभियानांतर्गत दिव्यांगाच्या विविध योजनांची माहिती व धनादेश वाटप

 


 कृष्णा भोसले                                                                     तळा : ७ जुलै,

           शासन आपल्या दारी या अभियानांतर्गत  पंचायत समिती व तळा तहसील कार्यालय यांचे वतीने दिव्यांगाच्या विविध योजनांची माहिती  जनसामान्यांपर्यंत पोहचवण्यासाठी शिबीराचे आयोजन तहसील कार्यालयात आयोजित करण्यात आले होते.                                                                             शिबीरात तळा तहसीलदार स्वाती पाटील यांनी दिव्यांगाच्या अडीअडचणी व समस्या असल्यास त्या सोडविण्यासाठी शासन स्तरावर मदत केली जाईल. आपण याबाबत माहिती घेऊन त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करु असे सांगितले. तर गटविकास अधिकारी कुलदीप बोंगे यांनी पंचायत समिती स्तरावरील प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये ग्रामसेवकांच्या सहकार्याने दिव्यांगाच्या योजना राबविण्यात येत आहेत. यासाठी अधिक प्रभावी पणे काम करुन दिव्यांग बांधवांना मदत केली जाईल. असे सांगितले.                                 


  या शिबिरात दिव्यांगाचे तालुका अध्यक्ष किशोर पितळे यांनी दिव्यांगाच्या विविध योजना त्यांच्या अडीअडचणी व समस्या याबाबत माहिती दिली. तर कार्याध्यक्ष कृष्णा भोसले यांनी दिव्यांगाच्या यु आयडी कार्ड साठी गट विभागात शिबिरे आयोजित करुन कुणीही दिव्यांग वंचित रहाणार नाहीत यासाठी प्रयत्न व्हावेत असे सांगितले.                                                              यावेळी या शिबिराला तहसीलदार  स्वाती पाटील, निवासी नायब तहसीलदार मंगेश पालांडे, मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, तळा अपंग सहकार्य संघटनेचे अध्यक्ष किशोर पितळे, कार्याध्यक्ष कृष्णा भोसले तालुक्यातील ग्रामसेवक,दिव्यांग बांधव, महीला  मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पंचायत समितीचे वतीने जवळपास १५ लाभार्थ्यांना धनादेश वाटप करण्यात आले. 

   

Post a Comment

0 Comments

विकास कामाच्या जोरावर महेश बालदि पुन्हा आमदार होणार मा.सरपंच माजगांव- गोपीनाथ जाधव