मांदाड जिल्हा परिषद गटाचे सदस्य बबन चाचले यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

 मांदाड जिल्हा परिषद गटाचे सदस्य बबन चाचले यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन



 कृष्णा भोसले 
तळा : २८ जुलै,
            
               तळा तालुक्यातील मांदाड  जिल्हा परिषद गटाचे माजी सदस्य बबन चाचले वय ६२ वर्ष यांचे आज दुपारी हृदयविकाराच्या धक्याने निधन झाले.ते पन्हेळी गावचे सुपुत्र होते.बबन चाचले यांना शुक्रवारी (दि.२८ जुलै) दुपारी तीव्र हृदयविकाराचा धक्का आला यातच त्यांची प्राणज्योत मावळली त्यांच्या पश्चात भाऊ, पत्नी, मुले, नातवंडे असा परिवार आहे. उदया शनिवारी सकाळी १० वाजता त्याच्यांवर त्याच्यां पन्हेळी या गावी अत्यंसंस्कार होणार आहेत.   
                    त्यांची शिवसेना पक्षाकडून राजकीय कारकीर्द सुरू झाली.दीर्घकाळ त्यांनी शिवसेना तालुका प्रमुख म्हणून चांगले काम केले,२००२ साली त्यांची जिल्हा परिषद सदस्य म्हणून बिनविरोध निवड झाली होती.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्या नंतर मांदाड जिल्हा परिषद गटातून ते निवडून आले,जिल्हा परिषदेमध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रतोद म्हणून जवाबदारी पार पाडली खा.सुनील तटकरे यांचे कट्टर समर्थक होते.
          दिलखुलास स्वभावाचे व्यक्तिमत्व लाभलेले बबन चाचले यांचा केवळ तळा तालुक्यातच नाही तर संपूर्ण जिल्ह्यात मोठा जनसंपर्क होता.कुणबी समाजाचे प्रतिनिधित्व देखील त्यांनी केले चाचले यांच्या जाण्याने समाजात फार मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

Post a Comment

0 Comments

ग्रामीण रुग्णालय चौक येथे लहान मुलांची आरोग्य तपासणी,मार्गदर्शन शिबीर