पिक स्पर्धाचे आयोजन,तालुका कृषि अधिकारी यांनी स्पर्धेत सहभागी होण्यांचे शेतक-यांस आवाहन

 पिक स्पर्धाचे आयोजन,तालुका कृषि अधिकारी यांनी स्पर्धेत सहभागी होण्यांचे शेतक-यांस आवाहन 




पाताळगंगा न्यूज  : वृत्तसेवा
खोपोली / रायगड  : २८ जुलै

              आज प्रत्येकांचे आयुष्य हे स्पर्धाने भरले आहे.प्रत्येक वेळी आपल्याला संघर्ष करुन जगावे लागते.शेतामध्ये भात पेरणी,लागवड ते कापणी पासून लवकर पुर्ण व्हावी यासाठी सुद्धा जणू शेतकरी स्पर्धाच करावी लागते.पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतक-यांकडून विविध प्रयोग कृषि खात्याच्या माध्यमातून केले जाते यामुळे उत्पादकतेत वाढ करण्यासाठी तालुका,सह जिल्हा,राज्यस्तरीय ही पिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, ३१ ऑगस्ट पर्यंत पिक स्पर्धेत सहभागी होण्यांचे आवाहन तालुका कृषी अधिकारी सुनिल निंबाळकर यांनी केले.
     

   त्याच बरोबर पावसामुळे शेतीचे नुकसान झाल्यांस शेतकरी बांधवांना नुकसान भरपाई मिळू शकते यासाठी  पिक विमा काढणे अनिवार्य असून त्यांची मुदत ३१ जुलै पर्यंत आहे.असल्यामुळे कृषि अधिकारी यांनी सांगितले आहे.पिक स्पर्धा आयोजन करण्यामागे एकच उद्दिष्टे की.राज्यामध्ये अशा प्रयोगशील शेतक-यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांचे मनोबल वाढून आणखी उमेदीने नवनवीन अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. यामुळे कृषि उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतक-यांचे योगदान मिळेल.
                  तसेच त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतक-यांना होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल, हा उद्देश ठेऊन राज्यांतर्गत पिकस्पर्धा योजना राबविण्यात येत आहे.यामध्ये ११ पिकांसाठी पिकस्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे.यामध्ये तालुका स्तरीय पहिले बक्षीस - ५०००  ,दुसरे बक्षीस - ३ ००० रुपये, तिसरे बक्षीस २००० रुपये तसेच जिल्हा स्तरीय पहिले १०,००० दुसरे ७००० तिसरे ५००० तसेच राज्य स्तरीय पहिले बक्षीस ५०,००० दुसरे ४०,००० तिसरे ३०,००० अशी वर्गवारी करण्यात आल्यांचे ,कृषि पर्यवेक्षक चौक नितीन महाडिक यांनी प्रतिनिधी शी बोलतांना सांगितले तसेच  खरीप हंगाम सन २०२३ पिकस्पर्धेसाठी तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकरी बांधवानी सहभाग घ्यावा असे आवाहन तालुका कृषी अधिकारी, खालापूर सुनिल निंबाळकर यांनी केले आहे.


Post a Comment

0 Comments

ग्रामीण रुग्णालय चौक येथे लहान मुलांची आरोग्य तपासणी,मार्गदर्शन शिबीर