चिंचवळीचा पूल धोकेदायक परिस्थितीत,अपघात घडल्यावरच डोळे उघडतील का?
दत्तात्रय शेडगे
खालापूर : १ ऑगस्ट,
साजगाव अडोशी रस्त्यावरील मध्यभागी असलेल्या चिंचवली गोहे येथील पुलाची अवस्था बिकट झाली असून मोठ मोठे खड्डे पडले आहेत.त्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करणे धोकेदायक बनले असून हा पूल केव्हाही कोसळून मोठा अपघात घडून जीवितहानी झाल्यावरच प्रशासनाचे डोळे उघतील का? अशी चर्चा परिसरातील नागरिक करीत असून प्रवासी वर्गामध्ये नाराजिचा सुर उमठत आहे.
खोपोलीत येण्यासाठी आणि आडोशीकडे जाण्यासाठी येथे दोन पूल आहेत त्यातील एक फार वर्षांपूर्वीचा असून दुसरा काही वर्षांपूर्वीच बनविला आहे.मात्र याच पुलावर खूप मोठे खड्डे पडले आहेत.तसेच जागोजागी जीर्ण होऊन तडे गेले आहेत त्यामुळे हा पूल कोणत्याही वेळी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.असे झाले तर येथील नागरिकांचा खोपोलीशी संपर्क तुटून जाईल.अश्या पुलावरून एखादे मोठे वाहन किंवा प्रवासी बस,विद्यार्थ्यांची बस, या यांच मार्गावरून जात असतात.परिणामी या मार्गावर धोक्याचे सावट निर्माण झाले आहे.
खालापूर तालुक्यातील मोठी औद्योगिक वसाहत म्हणून साजगाव आडोशी विभागाकडे पाहिलं जात.याच विभागात आठ गावे आणि अनेक वाड्या आहेत.या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कारखाणदारी असल्याने अवजड वाहनांन सोबत कामगार आणि स्थानिकांच्या वाहनांची नेहमीच रेलचेल असते.त्यामुळे हा रस्त्या वाहनाविना पाहणे म्हणजे मुश्किल आहे.मात्र संबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळे या रस्त्यावरील चिंचवली गोहे येथील पूल धोकेदायक परिस्थिती मध्ये आहे.
मात्र याच कोणतही सोयरसुतक संबंधित अधिकाऱ्यांना नसल्याने मोठा अपघात घडून जीवितहानी झाल्यानंतरच प्रशासनाचे डोळे उघडतील का असा प्रश्न परिसरातील नागरिक उपस्थित करीत असून रोज या परिसरातील नेतेमंडळी याच रस्त्यावरून प्रवास करीत असताना त्यांना हा धोकेदायक पूल दिसत नाही का असा सवालही नागरिक करीत आहेत
0 Comments