गारमाळ स्मशानभूमीचे सरपंच बाळासाहेब आखाडे यांच्या हस्ते भूमिपूजन

 गारमाळ स्मशानभूमीचे सरपंच बाळासाहेब आखाडे यांच्या हस्ते भूमिपूजन 

 

दत्तात्रय  शेडगे 
खालापूर : १ ऑगस्ट,

          मानवि मृत्यूचे चिरण स्थान म्हणजे स्मशानभुमी, घाटमाथ्यावर हे गाव असल्यामुळे याठिकाणी असलेली स्मशानभूमी दरवर्षी पावसात  सुटणाऱ्या वाऱ्यामुळे जमीनदोस्त होत असते.यामुळे ग्रामपंचायतने पुढाकार घेवून रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आणि हिरानंदानी यांच्या सीएसआर फंडातून याठिकाणी आरसीसी स्मशान भूमी बांधण्यात येणार आहे,चावनीचे सरपंच बाळासाहेब आखाडे आणि उपसरपंच सुखदेव भोसले यांच्या हस्ते पार पडले, 
              पावसाळ्यात दर वर्षी अत्यंसंस्कार हे भिजत करावे लागत होते.मात्र आता तो प्रश्न मार्गी लागणार आहे.यामुळे येथिल ग्रामस्थांना उत्तम अशी आरसीसी स्मशान भूमी बांधण्यात येणार आहे.रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे, आणि राष्ट्रवादी कॉग्रेसचे रायगड जिल्हा युवक अध्यक्ष अंकित साखरे यांच्या विशेष प्रयत्नातून हा जिल्हा परिषदेचा माध्यमातून  हे काम होणार  आहे, तर गारमाळ येथे असणाऱ्या हिरानंदानी या कंपनीने सामाजिक बांधिलकी जपत सीएसआर फंडातून आर्थिक मदत करणार आहे, यामुळे येथील ग्रामस्थांना भेडसावणारी समस्या अखेर सुटणार आहे, 
                 यावेळी सरपंच बाळासाहेब आखाडे ,उपसरपंच सुखदेव भोसले, हिरानंदानी कंपनीचे संजीव चौधरी, विशाल म्हात्रे, ग्रामस्थ बबन जानकर, शैलेश तुपे रघुनाथ आखाडे, निलेश चिंचावडे, सुभाष भोसले, संतोष शेडगे , आदी ग्रामस्थ उपस्थित होते

Post a Comment

0 Comments

अवघा रंग एक झाला,तळवली वारकरी यांच्याकडून पायी दिंडीचे आयोजन