२ वर्ष बंद असलेली ती बस अखेर झाली सुरू - देवन्हावे येथील अभि युवा ग्रुपचे ॲड.जयेश तावडेच्या मागणीला यश

 २ वर्ष बंद असलेली ती बस अखेर झाली सुरू - देवन्हावे येथील अभि युवा ग्रुपचे ॲड.जयेश तावडेच्या मागणीला यश,खोपोली ते देवन्हावे सकाळची बस सुरू झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण



समाधान दिसले 
खालापूर : २१ ऑगस्ट


              खोपोली शहरातील विविध शाळा व महाविद्यालयात शिक्षणाचे धडे गिरवण्याकरीता खोपोली नगर परिषदेकडून देवन्हावे येथे गेली ५० वर्षापूर्वी सुरु असणारी सकाळची ६  वाजून १०  मिनीटाची बस सेवा काही महीन्यांपूर्वी संबंधित ठेकेदार यांचेकडुन बंद करण्यात आली.ही बस सेवा लवकर सुरू न केल्यास संबधितांच्या विरोधात तिव्र आंदोलन करुन आमरण उपोषण केले जाईल, असा इशारा ॲड.जयेश तावडे यांनी निवेदनाद्वारे दिला असता या निवेदनाची दखल घेत बस सेवा सुरु करण्यात आली.
                  ही बस सेवा सुरु न झाल्यामुळे विदयार्थ्यांसह पालकाना नाहक त्रास सहन करावा लागत होता.तर बस सेवा बंद झाल्याने विदयार्थी, पालक व देवन्हावे गावकरी नगरपालिका प्रशासन आणि संबंधित ठेकेदारा विरोधात संताप व्यक्त करीत असताना विदयार्थी व पालकाच्या समस्येची दखल घेत देवन्हावे येथील अभी युवा ग्रुपच्या वतीने ॲड.जयेश तावडे व अन्य सदस्यानी विदयार्थ्यांसह खालापुरचे तहसीलदार आयुब तांबोळी व खोपोलीचे मुख्याधिकारी अनुप दूरे यांची भेट घेत निवेदन देऊन खोपोली ते देवन्हावे सकाळची ६  वाजून१०  मिनीटाची बस सेवा लवकर सुरू करा अशी मागणी केली होती, अभि युवा ग्रुपच्या कामगिरीचे विद्यार्थी - पालकांनी कौतुक करीत ॲड.जयेश तावडे यांनी तहसीलदार आणि मुख्याधिकार यांचे आभार मानले आहे.
              तर ही बस सेवा सुरू होण्यासाठी अभि युवा ग्रुपचे ॲड.जयेश तावडे यांच्या पाठपुराव्याखाली गौरव बारस्कर, शिवम नलावडे, शिवतेज तावडे, कुणाल पाटील, राज पाटील, अतिष पाटील, ॲड.भगवान लाले, साहिल पाटील, हर्षल चौधरी, सोहम चौधरी मेहनत घेतली असून सुरू झालेल्या बस सेवेमुळे विद्यार्थ्यांच्या खिशाला आता कात्री बसणार नाही, असे मत राज पाटील यांनी व्यक्त केले आहे.
 गेल्या दोन महिन्यापूर्वी शाळा व कॉलेज सुरु झाल्याने खालापूर तालुक्यातील ग्रामीण भागामधील विदयार्थी हे शिकण्यासाठी खोपोली शहरात जात असताना तालुक्यातील देवन्हावे गावामधील विदयार्थी ही मोठया सख्येने शिक्षणासाठी खोपोलीत ये - जा करीत असताना खोपोली - देवन्हावे अशी सकाळची ६  वाजून १०  मिनीटाची बस सेवा बंद झाल्याने विदयार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे,
                  तर ही बस बंद झाल्याने विदयार्थ्यांना वेळेत शाळेत अथवा महाविद्यालयात पोहचता येत नाही, त्यामुळे विदयार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत होते, व हे नुकसान कधिही भरून न येणारे होते. तसेच शाळेत व महाविद्यालयात काहीं विदयार्थी यांना वेळेत पोहचण्यासाठी नाईलाजास्तव रिक्षाने खोपोलीकडे प्रवास करावा लागत असे, परंतु विदयार्थ्यांना रिक्षाचे भाडे हे सर्वसामान्य वर्गातील विदयार्थी व पालकांना न परवडणारे असून बहुसंख्य विदयार्थी हे आपली कुंटूबाची अर्थीक परिस्थीती बेताची असल्या कारणाने पैसे वाचविण्यासाठी कोणत्याही अपरिचीत व्यक्तीच्या दुचाकी वाहन चालकाला हात करुन प्रवासासाठी विनवणी करत असे, 
            त्यामुळे अपरिचीत दुचाकी चालक विदयार्थ्यांना आपल्या वाहनावर बसुन पुढील प्रवास करतात तर काही दुचाकी चालक विदयार्थ्यांना घेवुन स्टंटबाजी करीत अति वेगाने वाहन चालवीत असल्याने विदयार्थ्यांचा हा प्रवास असुरक्षित असुन हा दुचाकीवरचा प्रवास भविष्यात मोठया अपघाताला आमंत्रण देउ शकतो, त्यामुळे ही विदयार्थी व पालकाच्या समोर मोठी समस्या उभी राहील्याने विदयार्थी - पालकाच्या समस्येची दखल घेत देवन्हावे येथील अभी युवा ग्रुपच्या वतीने ॲड.जयेश तावडे व अन्य सदस्यानी विदयार्थ्यांसह 
                  खालापुरचे तहसीलदार आयुब तांबोळी व खोपोलीचे मुख्याधिकारी अनुप दूरे यांची १७  जुलै रोजी भेट घेत खोपोली ते देवन्हावे सकाळची ६ वाजून १० मिनीटाची बस सेवा लवकर सुरू करा अशी मागणी निवेदनाद्वारे केली करीत जर ही बस सेवा लवकरात लवकर सुरू न केल्यास आमरण उपोषणाचा इशारा दिला असता या निवेदनाची दखल घेत खालापुरचे तहसीलदार आयुब तांबोळी यांनी मार्गदर्शन करत खोपोलीचे मुख्याधिकारी अनुप दूरे यांच्या आदेशाने बस सेवा पुन्हा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत असल्याने देवन्हावे येथील अभि युवा ग्रुपच्या मागणीला यश आले असून पाठपुरावा करणाऱ्या अभि युवा ग्रुपच्या सर्व सदस्यांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.


चौकट -
          खोपोली ते देवन्हावे सकाळची ६  वाजून १०  मिनीटाची बंद असलेली बस सेवा लवकर सुरू करा अशी मागणी खालापुरचे तहसीलदार आयुब तांबोळी, खोपोलीचे मुख्याधिकारी अनुप दूरे व सुधीर रोडलाइन व्यवस्थापनाला केली होती. तसेच ही सेवा लवकरात लवकर चालू न केल्यास संबधितांच्या विरोधात तिव्र आंदोलन करुन आमरण उपोषण केले जाईल असा इशारा निवेदनातून दिला असता, आमच्या निवेदनाची दखल घेत बस सेवा सुरू केल्याबद्दल तहसीलदार व मुख्याधिकारी यांचे मनापासून आभार तर या बस सेवेतून पुढील काळात विद्यार्थी पालक यांचे वायफळ खर्च वाचणार असून विद्यार्थ्यांचा प्रवास सुखकर होण्यास मदत होईल.
ॲड.जयेश तावडे - ग्रामस्थ देवन्हावे

Post a Comment

0 Comments

एक्झॉनमोबिल कंपनी कडून विद्यार्थ्यांस शैक्षणिक साहित्य वाटप