तालुक्यात नागपंचमी सण मोठ्या उत्साहात सजरा, या सणाच्या निमित्ताने नाग देवता वाचविण्यांचा महिला दिला संदेश

 तालुक्यात नागपंचमी सण मोठ्या उत्साहात सजरा, या सणाच्या निमित्ताने नाग देवता वाचविण्यांचा महिला दिला संदेश


पाताळगंगा न्यूज : वृत्तसेवा
माजगांव ,आंबिवली  : २१  ,ऑगस्ट, 

            श्रावण महिन्यातील पहिलाच सणांचे अगमन हे नागपंचमी पासून होत असल्यामुळे घरोघरी गोमेटी या वेळीचे तसेच बाजारा मधून पीओपी पासूनच्या तयार केलेल्या मातीच्या नागाची पुजा गृहीणी मोठ्या उत्साहाने करीत होत्या.सकाळ पासून घरामध्ये मांगल्याचं  वातावरण निर्माण झाले होते.विशेष म्हणजे या महिन्यात मांसाहारी वर्ज्य असल्यामुळे संपूर्ण महिना गोड - गोड खमंग तयार करण्यात आले होत.शिवाय सणाच्या निमित्ताने नाग देवतेला जगू द्या त्यांची हत्या करु नका असा संदेश महिला वर्गांनी दिला.
              नागपंचमी या सणाला जवळ - जवळ शेतीचे कामे पुर्ण झाली असतात शेत जणू हिरवे गार दिसत असतात.मात्र आपल्या शेतीचे रक्षण करणारे नागोबा आता दुर्मिळ होत चालले आहे.मात्र हा किलसवाना प्रकार कुठेतरी लगाम मिळावी,या सणाच्या निमित्ताने या सरपटणारे प्राणी यांना जिवदान मिळावे त्यांनी आपल्या शेतीचे रक्षण करावे या उद्देशाने आपल्या पुर्वजांनी या सणांची निर्मिती करण्यात आली आहे.
           आज विविध कारणास्तव नागांची संख्या रोडावली जात आहे. जंगलामध्ये वास्तव्य करणा-या त्याच्या हक्काच्या निवा-यावर गदा आल्यामूळे त्यांनी गावाकडे धाव घेत आहे.त्यातच त्यांची शिकार अथवा तस्करी होत आहे.मात्र हे कुठेतरी थांबावे या विचारांतून महिला वर्गांनी नाग देवतेला जिवन दान त्याला जगूद्या त्याची हत्या करु नका असा संदेश या नागपंचमी या सणाच्या दिवशी देण्यात आला.
        


Post a Comment

0 Comments

एक्झॉनमोबिल कंपनी कडून विद्यार्थ्यांस शैक्षणिक साहित्य वाटप