कामोठे कॉलोनी फोरमच्या वतीने झुंबा सेशन द्वारे हेल्थ फर्स्ट चा मेसेज देत मैत्री दिन उत्साहात साजरा
संजय कदम
पनवेल : ६ ऑगस्ट,
कॉलोनी फोरमच्या सर्व समन्वयकांनी झुंबा सेशन चा मनोसोक्त आनंद लुटत मैत्री दीन साजरा केला. एका संघटनेमध्ये एका विचारावर एका कॉमन उद्दिष्टसाठी काम करत असताना सर्व समन्वयकांमध्ये निखळ निस्वार्थ मैत्रीचे नाते वृध्दींगत होण्यासाठी आज कॉलोनी फोरमच्या समन्वयकांनी एकत्र जमून मैत्री दिन साजरा करत हेल्थ फर्स्ट चा मेसेज दिला.
कामोठे कॉलोनी फोरमच्या वतीने सातत्याने कामोठे शहारातील नागरी समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले जातात. कॉलोनी फोरमचे समन्वयक मालमत्ता कर विरोधी लढा असेल किंवा शहारातील नागरी समस्या सोडविण्यासाठी कायम प्रशासनासोबत संघर्ष करत असतात. वर्षभर विविध उपक्रम, निषेध मोर्चे आणि आंदोलने राबविनाऱ्या समन्वयकांच्या निरोगी आरोग्यासाठी आज मैत्री दिनानिमित्त झुंबा सेशन चे आयोजन करण्यात आले होते.
अन्यायाविरोधात लढायचे असेल संघर्ष करायचा असेल तर समन्वयकांनी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त असणे गरजेचे आहे. त्याच हेतूने मैत्री दिनानिमित्त सामाजिक चळवळीतील आपल्या सर्व सहकार्यांचे आरोग्य तंदुरुस्त राहावे ह्या साठी नंदिता मॅडम ह्यांच्या एनर्जेटिक झुंबा सेशन चे आयोजन करत हेल्थ फर्स्ट चा मेसेज देण्यात आला.
0 Comments