लैंगिक हिंसाचार रोखण्यासाठी लैंगिक आणि आरोग्य शिक्षणाचे महत्व...

 लैंगिक हिंसाचार रोखण्यासाठी लैंगिक आणि आरोग्य शिक्षणाचे महत्व...



पाताळगंगा न्यूज : वृत्तसेवा
खोपोली : ९ ऑगस्ट,

          शालेय व महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांच्या मनातील लैंगिक प्रश्नांना व शंकांना व्यक्त होण्यासाठी व माहिती जाणून घेण्यासाठी सहज सेवा फाउंडेशनच्या वतीने एक हक्काचं सहज व्यासपीठ शाळेमधील  विद्यार्थिनींसाठी उपलब्ध करून देण्याच्या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला असून जनता विद्यालय,लौजी येथील विदयार्थ्यांना खोपोली येथील सहज सेवेच्या उपाध्यक्षा इशिका शेलार यांनी विद्यार्थिनींना  प्रभावी भाषेत मार्गदर्शन केले.   
              लैंगिकतेच्या अनुषंगाने होणाऱ्या भावनिक बदलांशी जुळवून घ्यायला शिकवणे, भावभावनांची देवाण -  घेवाण करण्यासाठी संयमित करायला शिकणे या गोष्टीही येतात.सहज सेवा फाउंडेशनच्या वतीने आदिवासी दिना निमित्त जनता विद्यालय,लौजी येथे लैंगिक शिक्षण मार्गदर्शन करण्यात आले.
                या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी जनता विद्यालय,लौजीचे बुवा ,बोरसे,संगीता पवार , वैशाली डोईफोडे ,विजया ननवरे  व शालेय स्टाफ  यांचे विशेष सहकार्य लाभले.सहजसेवा फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.शेखर जांभळे,कार्याध्यक्षा माधुरी गुजराथी,उपाध्यक्षा इशिका शेलार, सचिव अखिलेश पाटील,खजिनदार संतोष गायकर,जनसंपर्क प्रमुख जयश्री कुलकर्णी,महिला संघटक निलम पाटील, खालापुर  तालुका प्रमुख मोहन केदार,सागरिका जांभळे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अथक  परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments

विकास कामाच्या जोरावर महेश बालदि पुन्हा आमदार होणार मा.सरपंच माजगांव- गोपीनाथ जाधव