सोनसडे ग्रा.पं.मध्ये लोकप्रतिनिधींनी व नागरीकांनी घेतली पंचप्रण प्रतिज्ञा!

 सोनसडे ग्रा.पं.मध्ये लोकप्रतिनिधींनी व नागरीकांनी घेतली पंचप्रण प्रतिज्ञा! 



कृष्णा भोसले
तळा : ९ ऑगस्ट,
               शासनाच्या आदेशानुसार मेरी मिट्टी मेरा देश या अभियानांतर्गत सोनसडे ग्रामपंचायतीमध्ये पंच प्रण प्रतिज्ञेचे आयोजन करण्यात आले होते.हातात दिवे घेऊन प्रतिज्ञेचे सामुहिक पठन केले. ग्रामसेवक उमाजी माडेकर यांनी संपूर्ण कार्यक्रमाची रुपरेषा सांगितली.१३ ते १५ ऑगस्ट रोजी घरोघरी तिरंगा फडकवून हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वानी सहकार्य करावे असे आवाहन या वेळी करण्यात आले.

             यावेळी सरपंच माधुरी पारावे,उपसरपंच, सदस्य, गाव अध्यक्ष, प्रतिष्ठित मंडळी, सोनसडे अध्यक्ष देवजी गावडे, कलमशेत अध्यक्ष जानु अडखळे, वावेहवेली अध्यक्ष महादेव पारावे ग्रां .पं.सदस्य परशुराम वरंडे, ग्रामसेवक उमाजी माडेकर, माजी सरपंच लक्ष्मण खांडेकर, मुख्याध्यापिका नेहा तार, उप शिक्षक, विदयार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी सर्वानी उभे राहून कार्यक्रम यशस्वी रित्या संपन्न करण्यात आले.

Post a Comment

0 Comments

संताच्या चरणावर  मस्तक ठेवले तर मानवी जीवन धन्य होतो. ह.भ.प.रामदास भाई महाराज पाटील