आसावरी घोसाळकर यांच्याकडून विद्यार्थ्यांना ओळखपत्राचे वाटप

 आसावरी घोसाळकर यांच्याकडून विद्यार्थ्यांना ओळखपत्राचे वाटप





हनुमंत मोरे
खोपोली : १७ ऑगस्ट,

             शिवसेनेच्या खोपोली शहर संघटक आसावरी घोसाळकर यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त प्राथमिक शाळा परखंदे येथील ४७ विद्यार्थ्यांना स्वखर्चाने ओळखपत्र दिले.ओळखपत्रामुळे आपल्याला नवी ओळख निर्माण झाल्याचा आनंद परखंदे प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर पहायला मिळाला.आपल्या गळ्यातील आयकार्ड बारकाईने न्याहाळत हे विद्यार्थी आपले आयकार्ड किती छान असल्याचे एकमेकांना सांगत होते.

                  सध्या प्रत्येक जण आपला वाढदिवस वेगवेगळ्या पध्दतीने साजरा करीत असतो.वाढदिवसानिमित्ताने फुकटखाऊ लोकांचा गोतावळा जमा होत पार्टीच्या नावाखाली पैशांची उधळपट्टी केली जाते.ही परंपरा कुठेतरी खंडीत होतांना पहायला मिळत आहे.शिवसेनेच्या खोपोली शहर संघटक तथा ओबीसी समाजाच्या जिल्हा पातळीवरील नेत्या आसावरी घोसाळकर यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त परखंदे येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना ओळखपत्र बणवून दिले.

                   या ओळपत्रावर विद्यार्थ्यांचा फोटो,शाळेचे नाव,पत्ता,पालकांचा फोन नंबर व मुख्याध्यापकांचा शिक्का व सही अश्या पध्दतीने रंगीत ओळखपत्र चिमुकल्यांच्या गळ्यात घालायला मिळाल्याने मुलांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.घोसाळकर मॅडम यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त खरोखरच खेडेगावातील मुलांना दिलेली भेट कायम स्मरणात राहील अशी आहे असे म्हटले तर वावगे ठरणारी नाही.



_____ पालक वर्गाकडून घोसाळकर मॅडम यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा -----
आपली मुले जरी ग्रामीण भागातील शाळेत शिक्षण घेत असलीतरी त्यांची खरोखरच काळजी घेणारे आमच्या व्यतिरिक्त अन्य कोणीतरी आहे.याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो.आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून आसावरी घोसाळकर यांनी स्वखर्चातून मुलांना ओळखपत्र बणवून दिल्यामुळे आमच्या मुलांच्या अलंकारात तर भर पडली आहेत सोबत त्यांना शाळेत जाण्याची आणखीनच ओढ निर्माण होणार असल्याचे सांगितले.

____ ग्रामीण भागातील विद्यार्थी हुशार -----
माझ्या मनात खूप दिवस एक विचार घोळत होता.की ज्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा सहज उपलब्ध होत नाहीत,त्यांना जादा शिक्षणाची सुविधा मिळत नाही.काही विद्यार्थ्यांच्या पालक अशिक्षित असतात.त्यांचीच मुले हुशार कशी असतात?मात्र हे सर्व सत्य असल्याने या मुलांना काहीतरी द्यावे अशी माझी प्रामाणिक इच्छा होती ती आज यानिमित्ताने पूर्ण झाली याचा मला अभिमान असल्याचे आसावरी घोसाळकर यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments

विकास कामाच्या जोरावर महेश बालदि पुन्हा आमदार होणार मा.सरपंच माजगांव- गोपीनाथ जाधव