पत्रकारांवर होणाऱ्या हल्यांच्या निषेधार्थ खोपोलीत पत्रकारांच्या वतीने संरक्षण कायद्याच्या जीआर ची होळी करत पत्रकारांनी केले अंदोलन

 पत्रकारांवर होणाऱ्या हल्यांच्या निषेधार्थ खोपोलीत  पत्रकारांच्या वतीने संरक्षण कायद्याच्या जीआर ची होळी करत पत्रकारांनी केले अंदोलन 



हनुमंत मोरे
खोपोली/ वावोशी १७ ऑगस्ट,
         
            महाराष्ट्रातील निर्भिड पत्रकारीता करत अवैद्य धंदे चालकांच्या मुसक्या आवळण्यासाठी हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून तो मजबूत बणविण्यासाठी पत्रकार कायदा करण्यात आला.ग्रामीण व शहरी भागातील पत्रकारांना निर्भिडपणे पत्रकारीता करता यावी म्हणून महाराष्ट्र सरकारकडून पत्रकार संरक्षण कायदा करण्यात आला असताना,मात्र राज्य सरकारकडून या कायद्याची अंमलबजावणी करण्यात होत असलेल्या  कुचराईमुळे पत्रकारांवर होणाऱ्या हल्यांच्या निषेधार्थ खोपोलीत  पत्रकारांच्या वतीने संरक्षण कायद्याच्या जीआर ची होळी करत पत्रकारांनी केले अंदोलन करण्यात आले.


               दिवसागणित पत्रकारांवर होणाऱ्या जिवघेण्या हल्यांमध्ये वाढ होत आहे.पत्रकारांवर होणाऱ्या हल्यांच्या निषेधार्थ राज्यातील अनेक पत्रकार संघटनांचे अंदोलन  सूरु असून खालापूर तालुक्यातील प्रेस क्लबच्या पुढाकारातून व्हाईस आॕफ मिडिया यांच्यासह  अन्य संघटना एकत्र येवून आज दि.१७ आॕगस्ट  रोजी सकाळी नऊच्या दरम्यान शिळफाटा येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ खालापूर व खोपोली शहरातील पत्रकारांच्या वतीने संरक्षण कायद्याच्या जीआर ची होळी करीत अंदोलनाद्वारे आपला निषेध व्यक्त करण्यात आला. 

              यावेळी खालापूर प्रेसक्लबचे अध्यक्ष  प्रशांत गोपाळे , व्हाईस आॕफ मिडिया शहर अध्यक्ष किशोर साळुंके , व्हाईस वाॕफ मिडिया तालुका अध्यक्ष शाबीर शेख, शेखर जांभळे, आकाश जाधव,बंटी साळुंके , दत्ता शेडगे,जगन्नाथ ओव्हाळ,संदीप ओव्हाळ,संतोष मोरे, समाधान दिसले,बाबू पोटे,अनिल पाटील,रविंद्र मोरे, संतोषी म्हात्रे,एस टी पाटील आदी पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.

Post a Comment

0 Comments

विकास कामाच्या जोरावर महेश बालदि पुन्हा आमदार होणार मा.सरपंच माजगांव- गोपीनाथ जाधव