व्हाईस ऑफ मीडिया राष्ट्रीय संघटनेकडून पत्रकारांच्या विविध मागण्यांसाठी खालापूर तहसील येथे निवेदन

 व्हाईस ऑफ मीडिया राष्ट्रीय संघटनेकडून पत्रकारांच्या विविध मागण्यांसाठी खालापूर तहसील येथे निवेदन 



दिपक जगताप  ( पाताळगंगा न्यूज )
खालापूर : २८ ऑगस्ट,

                  राज्यभरातील पत्रकार लोकशाही टिकवण्यासाठी पत्रकार आपल्या लेखणीने संघर्ष करत आहे मात्र राज्यातील पत्रकारांची अवस्था बिकट आहे तरी जनहीताच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या पत्रकारांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करण्यात यावा म्हणून व्हाईस ऑफ मीडिया राष्ट्रीय अध्यक्ष श्री संदीप काळे व राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री फिरोज पिंजारी यांच्या मार्गदर्शनाखाली आज व्हाईस ऑफ मीडिया राष्ट्रीय संघटनेकडून संपूर्ण राज्यात निवेदन देण्यात आले.
             ह्या ज्या 1) पत्रकारांना पत्रकारितेमध्ये दहा वर्षे पूर्ण झाली आहेत अशा पत्रकारांना अधिस्विती कार्ड देण्यात यावे, 2)राज्याच्या माहिती महासंचालनालयाने शासनाचे पोर्टल तयार करून त्या पोर्टलवर नव्याने पत्रकारितेत पदवी पूर्ण करून किमान तीन महिने पत्रकारितेचे प्रशिक्षण पूर्ण  केले आहे अशा पत्रकारांना पत्रकार म्हणून प्रमाणपत्र देण्यात यावे,3)पत्रकारांसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्यात यावे,4)राज्यात अनेक वर्तमानपत्र ,साप्ताहिके ,मासिक यांना जाहिरात देताना सातत्याने डावलण्या प्रकार पुढे आला आहे तो प्रकार थांबवून जाहिराती देण्यात याव्यात ,5)माहिती महासंचालनालय यांच्या वतीने सकारात्मक पत्रकारितेला प्रोत्साहीत करणारे पुरस्कार देण्यात यावे,6)टीव्ही ,रेडियो आणि सोशल मीडियात काम करणाऱ्या पत्रकारांना श्रमिक पत्रकार म्हणून मंत्रिमंडळाने घोषणा केली आहे या दोन विषयांचा तात्काळ जी आर काढण्यात यावा ,7)अधिस्वीकृती कार्ड आणि सेवानिवृत्ती नंतर देण्यात येणारे मानधन याबाबत असणाऱ्या जाचक अटी रद्द करण्यात याव्यात.
         त्याबाबत कमिटी नेमून ज्यांचे प्रस्ताव रखडले आहेत ते मार्गी लावावेत,8)सोशल मीडिया पत्रकारितेसाठी तातडीने जाहिरातीबाबत पॉलिसी बनवावी व सोशल मीडियायांनाही जाहिरात देण्याबाबत निर्णय घेण्यात यावा ,9)पत्रकार व त्यांच्या कुटुंबायांना विमा सुरक्षा कवच देण्यासंबंधीच्या सूचना प्रत्येक नोंदणी असलेल्या माध्यमांच्या मालकांना देण्यात याव्यात ,सरकार आणि राज्य कामगार विभाग यांना या सूचनांचे पालन काटेकोर करण्याबाबत मार्गदर्शीका द्यावी,
            10)मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांच्या सेवानिवृत्तीनंतर देण्यात येणारे मानधन वीस हजार रुपये करू अशी घोषणा केली होती त्या घोषणेची अमलबजावणी करण्यात यावी 
ह्यावेळी हेमलता चिंबुलकर जिल्हाध्यक्ष व्हाईस ऑफ मीडिया, दिपक जगताप व्हाईस ऑफ मीडिया तालुका अध्यक्ष ,संतोष मोरे कार्याध्यक्ष व्हॉइस ऑफ मीडिया, किशोरीताई चेउलकर व्हॉइस ऑफ मीडिया महिला तालुका अध्यक्ष,जितेंद्र भोईर डिजिटल मीडिया खालापूर तालुका अध्यक्ष व्हाईस ऑफ मीडिया, किशोर साळुंखे खोपोली शहर अध्यक्ष व्हाईस ऑफ मीडिया, सचिन यादव पत्रकार आदी उपस्थित होते. 

Post a Comment

0 Comments

ग्रामीण रुग्णालय चौक येथे लहान मुलांची आरोग्य तपासणी,मार्गदर्शन शिबीर