कर्जत मधील अवैध मटका जुगार बंद करण्याची किशोर साळुंके यांची एस. पी. कडे मागणी
पाताळगंगा न्यूज : वृत्तसेवा
खोपोली : २७ ऑगस्ट,
रायगड जिल्ह्यातील एक ऐतिहासिक तालुका म्हणून कर्जत तालुक्याकडे पाहीले जाते. याच ऐतिहासिक कर्जतच्या बाजारपेठेतच मटण मार्केटमध्ये अवैध पणे मटका व जुगार चालत असल्याने कर्जत नगरीचे नाव खराब होत असून सदर अवैध धंदे त्वरित बंद करण्याची मागणी रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अलिबाग यांच्याकडे बहुजन युथ पँथर चे खोपोली शहर अध्यक्ष तथा शिवसेना (बाळासाहेब ठाकरे )प्रतिनिधी प्रमुख किशोर साळुंखे यांनी केली आहे.
घाटमाथा आणि कोकण यांचा मध्यम दुवा म्हणून कर्जतची ओळख आहे. या कर्जत नागरीने अदयापर्यंत साधारण आमदारकीची तीस वर्षे गाजविली. येथे कायदा सुव्यवस्था नेहमी उत्तम प्रकारे राबविली जाते. येथील पोलीस यंत्रणाही चाणक्ष पद्धतीने गुन्हेगारीवर लक्ष ठेवून आहे. तरीही याच कर्जत नगरीच्या भर बाजारपेठेत मच्छी / मटण मार्केट मध्ये अवैधपणे खुले आम मटका व जुगार सुरु असल्याचे पाहावयास मिळते. हातावर पोट भरणारे, तरुण वर्ग या अवैध धंद्याकडे वळतात आणि आयुष्याची राख रांगोळी करून घेतात.
तेव्हा असे अवैध धंदे त्वरित बंद करावेत व अनेकांचे संसार वाचवावेत यासाठी बहुजन युथ पँथर चे खोपोली शरद अध्यक्ष तथा शिवसेना ( बाळासाहेब ठाकरे ) प्रसिद्धी प्रमुख किशोर साळुंके यांनी रायगडचे जिल्हा पोलीस अधीक्षक यांना लेखी निवेदन पाठवून मागणी केली आहे.
0 Comments