श्री क्षेत्र होराळे येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात कृष्ण जन्मोत्सव निमित्ताने सप्ताहाचे आयोजन
हनुमंत मोरे ( पाताळगंगा न्यूज )
खोपोली /वावोशी : २७ ऑगस्ट
आत्मोन्नती विश्वशांती वारकरी संप्रदाय संचलित गुरुवर्य हभप मारुती महाराज राणे यांच्या आशीर्वादाने तसेच गुरुवर्य हभप रामदास महाराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सालाबादप्रमाणे याही वर्षी श्री क्षेत्र होराळे येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दि. ३१ ऑगस्ट २०२३ ते दि.७ सप्टेंबर २०२३ पर्यंत अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रख्यात किर्तनकारांच्या कीर्तनाची सेवेचा लाभ ऐकायला मिळणार असल्याने या सेवेचा लाभ परिसरातील लोकांनी घ्यावा असे आवाहन श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थान कमिटी व वारकरी संप्रदाय मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
सप्ताहाचे निमित्ताने प्रारंभी श्रींची महापुजा करण्यात येते,त्यानंतर कळश,वीणा, पकवाद,टाळ, पताका, गरुडेश्वर व ग्रंथ पूजन केले जाते.यासाठी सेवेकरी आपले योगदान देत असतात.त्यानंतर वेदप्रणित गाथा पारायण केले जाते.याचे नेतृत्व हभप ज्ञानेश्वर महाराज पाटील करतात.त्यांना मृदुंग साथ हभप आदर्श महाराज,हभप भूषण ठोंबरे ,हभप विशाल लबडे तर हार्मोनियम साथ हभप भागवत पाटील यांची असते तर साथ संगत हभप अक्षय महाराज,हभप यश महाराज यांच्या सोबत पारायणात सहभागी असलेले सर्व भाविक देत असतात.
सुसंगित भजनानंद कल्लोळ (दररोज दुपारी ३ ते ५ गुरूवार दि.३१ ऑगस्ट २०२३ रोजी जेष्ठ नागरिक भजन सेवक होराळे मंदिर, शुक्रवार दि.१ सप्टेंबर रोजी हभप ज्ञानेश्वर महाराज (भक्त सहोदय युवा वारकरी भजनानंद), शनिवार दि.२ सप्टेंबर रोजी हभप विठोबा कर्णुक (श्री संत बाबा विष्णू दत्त भजन मंडळ,बीड), रविवार दि.३ सप्टेंबर रोजी हभप जयराम बुवा म्हात्रे (गुरूसेवा भजन मंडळ,तमनाथ), सोमवार दि.४ सप्टेंबर रोजी हभप रुपेशबुवा देशमुख (सुरताल भजन मंडळ,नारंगी),मंगळवार दि.५ सप्टेंबर रोजी हभप आरतीताई मोरे(लव्हेश्वर प्रासादिक भजन मंडळ,झाडाणी), बुधवार दि.६ सप्टेंबर रोजी हभप कुंदन कुरूप (मार्लेश्वर भजन मंडळ,वनवठे)यांचे होणार आहे.
किर्तन(दररोज सायंकाळी ७ ते ९)
गुरूवार दि.३१ ऑगस्ट २०२३ रोजी भागवताचार्य, महाराष्ट्र रत्न हभप आत्माराम महाराज शास्त्री (आळंदी),शुक्रवार दि.१ सप्टेंबर रोजी हभप वनिताताई पाटील (भिवंडीकर),शनिवार दि.२ सप्टेंबर रोजी हभप बाळाजी महाराज मोहिते (बीड),रविवार दि.३ सप्टेंबर रोजी हभप विक्रांत महाराज पोंडेकर (सद्गुरू जोग महाराज वा.शि.स.आळंदी),सोमवार दि.४ सप्टेंबर रोजी भाषाप्रभू हभप जगन्नाथ महाराज पाटील (शहापूर - ठाणे),मंगळवार दि.५ सप्टेंबर रोजी विनोदाचार्य हभप पांडुरंग महाराज साळुंखे (बीड-मराठवाडा),बुधवार दि.६ सप्टेंबर रोजी श्रीकृष्ण जन्माचे किर्तन (रात्री १० ते १२) भागवताचार्य हभप संदीप महाराज गवांदे (संगमनेर), गुरूवार दि.७ सप्टेंबर रोजी काल्याचे किर्तन (सकाळी १० ते १२)गुरुवर्य हभप रामदास महाराज पाटील (आध्यात्मिक शिक्षण संस्था, गुरूकुल महड)यांचे होणार आहे.
कार्यक्रमाचे व्यवस्थापन
.शंकर सुदाम मानकवळे(शिरवली).राजेंद्र हिराजी पाटील (आपटी).प्रकाश उर्फ बाळा महादू पाटील (होराळे),.विजय वामनराव कदम(वनवठे),उदय उर्फ राजू विनायक शहासने(वावोशी),राकेश जयराम जाधव(गोरठण बुद्रुक),सुभाष दाजीराव मोरे(जांभिवली), भगवान लहू दळवी(आपटी),तानाजी चिंधु पाटील(गोरठण बुद्रुक),नामदेव कृष्णा पाटील ( होराळे),जनार्दन नारायण जाधव(गोरठण बुद्रुक),भगवान काशिनाथ शेट्ये(वावोशी), सुभाष खंडू पाटील(गोरठण बुद्रुक),पांडुरंग मोरेश्वर घोंगडे(उसरोळी),विष्णू रामचंद्र पाटील (खरिवली)
श्रींच्या महापूजेचे पौरोहित्य व नित्य पूजा
श्री.कालीदास महाराज जंगम (आपटी),श्री.हभप केशव नामदेव बुरूमकर (होराळे)
अन्य सेवा
इलेक्ट्रीकेशन - श्री. विश्वनाथ हरिभाऊ मुंढे, श्री. योगेश विलास कदम(वावोशीफाटा),
मंदिरात भाविकांसाठी मोफत वैद्यकीय सेवा
डॉ. प्रदिप एन. पाटील(श्री स्वामी समर्थ हॉस्पीटल, वावोशीफाटा)
वाहन नियंत्रक
कृष्णा रामचंद्र पाटील, नथुराम वासुदेव, म्हामुणकर, किसन पांडू शिंदे सर्वोतोपरी सहकार्य - मान. ग्रामस्थ मंडळ होराळे, जांभिवली, शिरवली, आपटी, झाडाणी, वनवठे, वावोशी, गोरठण बु., डोणवत, तांबाटी, तांबाटीवाडी, वडवळ, किरकींडी, नारंगी, चिलठण, तोंडळी, उसरोली, गोळेवाडी, खानाव, खरिवली, उदळोली, करंबेळी, गोठीवली, गोहे, नंदनपाडा, स्वाली, गारमाळ, गोरठण खु., परखंदे, कोयना, तळाशी, मायणी, माळदेव, उचाट, रानसई, वळवण, आराव, वावोशीफाटा, चिंचवली, ढेकू, वणवे निंबोडे, भक्त सहोदर युवा वारकरी छत्तीशी विभाग, पेण परिसर, खालापूर परिसर, कर्जत परिसर, पनवेल परिसर, सुधागड परिसर, रोहे परिसर इत्यादी.
सप्ताहात इतर सेवा
सर्वश्री. कोंडीराम मोरे, शशिकांत गौरू पाटील, सुरेश गोरे, अशोक पाटील, कृष्णा सावंत, राजेंद्र ज. पाटील, संजय कदम, किरण पाटील, काशिनाथ येरुणकर,
शेगडया
- श्री. मोतीराम रामजी पाटील (गोरठण बु.) मोफत सेवा
रांगोळी
- सौ. रजनी विश्वनाथ मुंढे व परिसरातील सहकारी भगिनी
कार्यकारी व सल्लागार
दहागाव छत्तीशी विभागातील सर्व सामाजिक, राजकीय,शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर व श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर श्री क्षेत्र होराळे येथे येणारे सर्व भाविक वर्ग.
0 Comments