स्वावलंबी बनविण्यासाठी नढाळवाडील महिलांना उद्योग प्रशिक्षण शिबीर,नाचणी,रानभाज्या पासून रेसीपी
पाताळगंगा न्यूज : वृत्तसेवा
नढाळवाडी : २७ ऑगस्ट
महिला वर्गांना स्वावलंबी बनविण्यासाठी खालापूर तालुका कृषी खात्याच्या माध्यमातून स्तुत्य उपक्रम हाती घेण्यात आले.यासाठी कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा तसेच श्री विवेकानंद रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट रोहा, यांच्या सहकार्याने नढाळवाडी येथिल महिलावर्गांस नाचणीचा केक, रवा केक, राजभोग केक व नाचणीची बर्फी , नाचणी व टाकळा चे अप्पे, नाचणी व शेवग्याची पाने वापरून अप्पे, कंटुली चे मंचूरियन, नाचणी व कंटुली वापरून मोमोज, सुरणाचे कटलेट अदि प्रात्यक्षिके करुन,मार्गदर्शन करण्यात आले.
निसर्गानी आपल्याला खूप काही देत आहे. मात्र त्या वस्तू वापर करून उत्तम असे खाण्यायोग्य पदार्थ बनविल्यांस या पासून आपणांस रोजगार प्राप्त होवू शकतो.त्यासाठी आपल्याला पदार्थ बनविण्यांचे ज्ञान असणे गरजेचे आहे.यावेळी तालुका कृषी अधिकारी खालापूर सुनिल निंबाळकर यांनी महिलांना आहारातील पौष्टिक तृणधान्य विषयी मार्गदर्शन केले.विवेकानंद रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट सुशील रुळेकर यांनी नाचणी व वरी पासून तयार होणाऱ्या विविध पदार्थान विषयी मार्गदर्शन केले.एक्सचेल सिक्युरिटी सुरेन्द्र सिंघवी यांनी रानभाजी आहारातील महत्त्व या विषयी महिलांना मार्गदर्शन केले.
श्री विवेकानंद रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट मधील अश्विनी फुलारे, हर्षदा दगडे, सायली भगत यांनी महिलांना विविध पदार्थ बनविण्यास महिलांना शिकवले.या कार्यक्रमाचे नियोजन मा. प्रकल्प संचालक आत्मा यांच्या बाणखेले मॅडम, उपविभागीय कृषि अधिकारी फुलसुंदर व तालुका कृषी अधिकारी खालापूर - सुनील निंबाळकर यांच्या मार्गदर्शना खाली तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक आत्मा प्रज्ञा पाटील यांनी केले.यावेळी मंडळ कृषी अधिकारी खालापूर,नितीन महाडिक,कृषि सहाय्यक चेतन चौधरी,तसेच उपविभागीय कृषि अधिकारी फुलासुंदर अदि च्या माध्यमातून कार्यक्रम संपन्न झाला.
0 Comments