राजिप शाळा पिरकटवाडील विद्यार्थ्यांना जिवनाश्यक वस्तू शैक्षणिक साहित्य वाटप - इनर व्हील क्लब पुणे प्लॅटिनम डिस -313 यांचा पुढाकार
पाताळगंगा न्यूज : वृत्तसेवा
पिरकटवाडी : २७ ऑगस्ट,
ग्रामीण भागत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना सातत्याने विविध संस्था मदत करीत असतात.यामुळे पालकांच्या खिशाला बसणारी झळ कोठेतरी कमी होत असते. रायगड जिल्हा परिषद शाळा पिरकटवाडी येथे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना ग्रूप ग्राम पंचायत लोधिवली सरपंच पुजा नितिन तवले यांच्या सहकार्य इनर व्हील क्लब पुणे प्लॅटिनम डिस -313 या संस्थेच्या व्यवस्थापक स्नेहल चोरडिया तसेच मानव मिलन महिला विभाग पुणे यांनी मुलांसाठी खूप काही देण्यात आल्यांने त्यांच्या चेहऱ्यावर समाधानांचे हास्य पहावयास मिळाले.
मानव मिलन महिला विभाग पुणे ब्रिजलाल शहा आणि ललिता ओसवाल
यांच्या कडून आमच्या शाळेतील गरीब गरजू विद्यार्थ्यांना तसेच वाडीतील सर्व कुटुंबांना छत्र्यां आणि ब्लँकेटचे वाटप करण्यात आले.त्याच बरोबर शैक्षणिक साहित्य,शैक्षणिक खेळणी,विविध प्रकारचे खेळाचे साहित्य वाटप करण्यात आले.आज ही समाज्यामध्ये असे काही संस्था आहेत की ते समाज्यातील गोर - गरिब च्या विकासासाठी झटत असल्यांचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे.
यावेळी शाळा प्रमुख यशवंत बिरादार सर यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.सदर विद्यार्थ्यांसाठी लागणारे साहित्य घेवून येण्यासाठी संतोष खैरे सर, सचिन नवले सर, बबन दावभट सर यांनी मदत केली तसेच चौक केंद्रीय प्रमुख गजानन साळुंखे,मोहन दळवी सर यांचे विद्यार्थी आणी पाहुणे वर्ग यांस मार्गदर्शन लाभले. शाळेला मोफत शैक्षणिक साहित्य आणि छत्र्या वाटप या प्रसंगी दोन्ही संस्थांचे, शाळा व्यवस्थापन समिती पिरकटवाडी अध्यक्ष, सर्व सदस्य, माता-पालक,आजी माजी विद्यार्थी या सर्वांचे शिक्षक जितेंद्र ठाकूर यांनी आभार मानले.
0 Comments