रा.जि.प.शाळा,वडगाव येथे विद्यार्थ्यांनी राखी विक्री व प्रदर्शन

 रा.जि.प.शाळा,वडगाव येथे विद्यार्थ्यांनी राखी विक्री व प्रदर्शन 

         

पाताळगंगा न्यूज : वृत्तसेवा
वडगांव : २९ ऑगस्ट

                  शाळेय शिक्षण घेत असतांना विद्यार्थ्यांना व्यावसायिक ज्ञान असणे अतिषय महत्वाचे आहे.यासाठी रायगड जिल्हा परिषद शाळा वडगांव येथे विद्यार्थ्यांना राख्या निर्मितीचे शिक्षण देण्यात आल्यांने त्यांनी सहज पणे राख्या बनविल्या,यासाठी शाळेमध्ये समर्थ राखी सेंटर,नक्षत्र राखी, गावदेवी राखी भांडार,एकलव्य राखी केंद्र अशी मुलांच्या स्टॉल ला नावे देण्यात आली होती.स्वता विद्यार्थ्यांनी केलेली राखी खरेदी करण्यासाठी या परिसरातील महिला वर्गांनी आपल्या भाऊराया साठी राखी खरेदि केली.


                  शाळा ही विद्यार्थ्यांना शिक्षणासमवेत व्यवहारी ज्ञान देण्यांचे काम करीत आहे.कोणतीही वस्तू ही  आपल्या बोलण्यच्या वस्तू गुणवत्ते नुसार विकली जाते.मात्र त्यासाठी आपले कौशल्य अतिषय महत्वाचे आहे मुख्याध्यापक सुभाष राठोड यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम हाती घेण्यात आला. विध्यार्थ्यांनी लावलेल्या स्टॉल यामुळे या परिसरातील महिला वर्गांनी राखी खरेदि करण्यात आली.
           


 यावेळी सह शिक्षक सरस्वती कवाद, वैजनाथ जाधव सर तर स्वयं सेविका निकिता गडगे,साक्षी जांभुळकर, मनीषा गडगे उपस्थित होत्या.यावेळी शाळेच्या व्यवस्थापन समिती सदस्य,माजी विद्यार्थी, पालक ग्रामस्थ व मुलांना ग्रुप ग्रामपंचायत वडगाव मा.सरपंच गौरीताई गडगे, यांचेकडून खाऊचे वाटप करून उपक्रमाची सांगता करण्यात आली.शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा मा.करुणा रवींद्र ठोंबरे,उपाध्यक्षा राजश्री नरेंद्र जांभुळकर, यांच्या उपस्थितीत राखी प्रदर्शन या सहशालेय उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.


  

Post a Comment

0 Comments

खालापूर तहसीलदार अभय चव्हाण यांच्या हस्ते वृक्षारोपण