ईर्शालवाडी,आणी खालापूर पोलीस बांधवांना खालापूर भाजपा महिला आघाडी कडून रक्षाबंधन

 ईर्शालवाडी,आणी  खालापूर पोलीस बांधवांना खालापूर भाजपा महिला आघाडी कडून रक्षाबंधन





दीपक जगताप  : ( पाताळगंगा न्यूज )
खोपोली : २९ ऑगस्ट

            आज रक्षाबंधन सण तालुक्यात मोठ्या उत्साहाने साजरा झाला.मात्र मागील महिन्यात ईर्शालवाडी येथे दरड  कोसळून आपल्या जवळच्या व्यक्तीला जिव गमवावे लागला.कुणाची बहीण,आई,मुलगी,मुलगा,मित्र त्यांना सोडून गेले. यामुळे  ते अजूनही या धक्यातून सावरले नसून त्यातच श्रावण महिन्यातील रक्षाबंधन सण हा भाजपच्या महिला वर्गांनी या ठिकाणी जावून तरुणांच्या हाताला राखी बांधली.बहीणींची उणीव भासू नये, तसेच खालापूर कर्तव्ये दक्ष असलेले पोलीस यांना सुद्धा राखी बांधण्यात आली. 
           नवीन जागेत कंटेनर वसाहतीत राहत असलेल्या वाडी कुटुंबांना शासनाकडून सामाजिक संस्थांकडून मदतीचा सातत्याने ओघ सुरू आहे.   खालापूर महिला भाजप आघाडीच्या वत्सला  मोरे माजी उपसभापती  ,भाजपा तालुका अध्यक्ष सुजाता दळवी निकिता हेलंदे ,यशोदा मोरे ,पुष्पा गवळी यांनी ईर्शाळवाडी तात्पुरती वसाहतीत भेट देत रक्षाबंधन साजरे केले. 
           इर्शाळवाडीतील अनेक कुटुंबात कर्ता भाऊ तर घराला हातभार लावणारी बहीण गमावली आहे. पारधी, दोरे या  कुटुंबाला मायेचा ओलावा देण्यासाठी भाजपा महिला आघाडीने साजरा केलेला रक्षाबंधन सण उपस्थित शासकीय अधिकाऱ्यांच्या मनात देखील मायेचा ओलावा निर्माण करणारा ठरला. यावेळी अनेकांचे डोळे पाणावले होते.तसेच सदैव जनतेचे रक्षण करणारे खालापूर पोलीस स्टेशनमधील पोलीस बांधवांना ही भाजपा महिला आघाडीकडून रक्षाबंधन करण्यात आले

Post a Comment

0 Comments

ग्रामीण रुग्णालय चौक येथे लहान मुलांची आरोग्य तपासणी,मार्गदर्शन शिबीर