पनवेल महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाची पदपथावर दुकानदारांची अतिक्रमणावर कारवाई

 पनवेल महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाची पदपथावर दुकानदारांची अतिक्रमणावर कारवाई




संजय कदम 
पनवेल २३ जुलै,
 
         पनवेल शहरात दुकानदारांनी पदपथावरच आपल्या दुकानातील माल डिस्काउंट मध्ये विक्रीस काढण्यासाठी ठेवल्याने पादचाऱ्यांना पुटपाथवरून चालायला सुद्धा जागा मिळत नसल्याची बातमी प्रसिद्ध होताच पनवेल महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने याची दखल घेत या दुकानदारांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.
       पनवेल शहरातील अनेक भागामध्ये  दुकानदारांनी आपल्या दुकानातील साड्या, ड्रेस मटेरियल, ड्रेसेस व इतर वस्तू सध्याच्या पावसाळ्याच्या दिवसात सेलच्या नावाखाली दुकानाच्या बहर पदपथावरच विक्रीस ठेवले आहे. त्यामुळे पादचाऱ्यांना चालायला फुटपाथ नाहीत. त्यातच शहरातील पदपथावरील अतिक्रमणामुळे पादचाऱ्यांना रस्त्यावर चालायला जागा नसल्याने नाइलाजास्तव रस्त्यावर चालावे लागत आहे.
              दुकानांचे जाहिरात फलक, पुतळे आदींचे अतिक्रमण शहरात पाहावयास मिळत आहे. याबाबत बातमी प्रसिद्ध होताच पनवेल महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने या बातमीची दखल घेत या दुकानदारांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. अतिक्रमण विभागाने केलेल्या या कारवाईबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले करत अशीच कारवाई सातत्याने चालू राहावी अशी मागणी केली आहे.   

Post a Comment

0 Comments

अवघा रंग एक झाला,तळवली वारकरी यांच्याकडून पायी दिंडीचे आयोजन